शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
2
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
3
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
4
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
6
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
7
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
8
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
9
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
11
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
12
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
13
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
14
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
15
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
16
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
17
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
18
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
19
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
20
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले

50 वर्षातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावले - आमदार उदेसिंग पाडवी

By admin | Updated: June 15, 2017 13:18 IST

मतदारांनी आपल्याला ज्या विश्वासाने निवडून दिले आहे तो विश्वास सार्थ ठरवीत उर्वरित अडीच वर्षातही आपल्या कामाचा हिशेब मतदारांना देण्याची ग्वाही शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिली.

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि. 15 - शहादा व तळोदा तालुक्यात गेल्या 50 वर्षापासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसह रस्ता, पूल, विद्युतीकरण यासह विकासाच्या कामांना प्राधान्य देवून अडीच वर्षात ती कामे मार्गी लावली. मतदारांनी आपल्याला ज्या विश्वासाने निवडून दिले आहे तो विश्वास सार्थ ठरवीत उर्वरित अडीच वर्षातही आपल्या कामाचा हिशेब मतदारांना देण्याची ग्वाही शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिली.आमदार उदेसिंग पाडवी यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध बाबींची माहिती देत संवाद साधला. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार उदेसिंग पाडवी यांनी सांगितले, आपण पुर्वीपाूसनच जनसंघाच्या विचारधारेत वाढलेलो आहोत. समाजसेवक लखनजी भतवाल, माजी मंत्री कै.दिलवरसिंगदादा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल राहिली. एक वेळा पंचायत समिती सदस्य राहिलो. पाच वेळा मतदारसंघात आमदारकीसाठी निवडणूक लढविली. परंतु यश आले नाही. सहाव्यांदा राज्याचे नेते माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जबाबदारी टाकली. शहादा-तळोदा मतदारसंघात भाजपतर्फे उमेदवारी दिली. निवडून आणण्याची जबाबदारी देखील उचलली. आणि सहाव्यांदा मला लोकांची सेवा करण्याची संधी मतदारसंघातून मिळाली. निवडून आल्यानंतर पहिल्यांदा कुठली कामे करायची याचे नियोजन केले. त्यानुसार मतदारसंघात यापूर्वी 35 ते 50 वर्षापासून मंजुरी मिळालेले, अर्धवट राहिलेले कामे मोठय़ा प्रमाणावर होती. आपण या कामांना प्राधान्य दिले. रहाटय़ावाड धरणाला 1985 साली मंजुरी मिळाली होती. परंतु काम रखडले होते. सुधारीत प्रस्ताव तयार करून नऊ कोटी रुपये मंजुर करून आणले. आता या धरणाचे काम 50 टक्के पुर्ण झाले आहे. रापापूर धरणाच्या कामालाही गती दिली. सुधारीत दराप्रमाणे शेतक:यांना जमिनीचा मोबदला दिला. 58 कोटींच्या  निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. लवकरच काम सुरू होणार आहे. धनपूर धरणाला 15 कोटी मिळाले. काम पुर्ण झाले असून जुलै महिन्यात जलपुजन करण्यात येणार आहे. इच्छागव्हाण धरणालाही मंजुरी मिळाली आहे. मतदारसंघातील तलाव, धरणे यांचा सव्र्हे करून दुरूस्ती, गाळ काढणे या कामांना नऊ कोटी रुपये खर्च लागणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी मागणी केली आहे. युती सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या बॅरेज प्रकल्पातंर्गत उपसा सिंचन योजना कार्यान्वीत करण्यासाठी शेतक:यांचे शिष्टमंडळ माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे घेवून गेलो. त्यांनी मुक्ताईनगर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना त्यासाठी 42 कोटी रुपये मंजुर करावयास लावले आणि हा प्रश्न सुटला. आता तांत्रिक बाबी पुर्ण करून ते काम सुरू होणार आहे. हातोडा पुलाला देखील प्राधान्य दिले. निधीअभावी रखडलेल्या या पुलाला राज्य नियोजन मंडळाकडून 18 कोटी रुपये मंजुर करून घेत अपुर्ण काम पुर्ण करून घेतले. पुढील महिन्यात त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याशिवाय स्वातंत्र्यानंतरही रस्ते न झालेल्या गावांना रस्ते करून दिले. मलगाव-सटीपाणी या साडेचार कोटीच्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. लिंबर्टी-धजापाणी व परिसरातील नऊ गावांसाठी साडेनऊ कोटी रुपयांचा रस्ता तयार केला. त्यातून साडेपाच कोटी रुपये मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजुर केले आहेत. खरवड-मोड रस्त्यावरील नदीवर पुल मंजुर केला आहे. शहादा व तळोदा येथील रखडलेली तालुका क्रिडा संकुलांची कामे मार्गी लावली आहे. मोदलपाडा येथील विद्युत केंद्राच्या रखडलेल्या कामालाही चालना दिली. आमलाड-बोरद रस्ता रुंदीकरणासाठी 16 कोटी मंजुर केले. कुकडेल ते पिंगाणा पुल मार्गी लावला. आडगाव नदीवरील पुलासाठी देखील एक कोटी 64 लाख रुपये मंजुर करून या पुलाचे काम मार्गी लावले. ही सर्व कामे करतांना मुख्यमंत्र्यांनीही योजनांच्या निधीसाठी कधीही हात आखडता घेतला नाही. वर्षानुवर्षापासून रखडलेली कामे मार्गी लागत असल्याने, अनेक गावात प्रथमच आमदार जात असल्याने गावकरी, सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आपल्याला मिळालेल्या या संधीचा सर्वसामान्य आणि तळागाळातील लोकांना किती आणि कसा फायदा होईल हेच विचार आपल्या मनात सतत राहत असतात. सर्व सामान्यांची कौतूकाची थापच आपल्याला काम करण्याची उर्जा देत असते. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे एका नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे दोघांच्या समन्वयातूनच कामे करावी लागतात. प्रत्येक बैठकांमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना देखील मी तेच सांगतो. प्रत्येक कामात अडचणी येतात, परंतु काम करण्याची उमेद आणि सातत्याने पाठपुरावा राहिल्यास कुठलेच काम अशक्य नाही. आपण याच गोष्टीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कामे जलद गतीने मार्गी लागत असल्याचेही आमदार उदेसिंग पाडवी यांनी यावेळी सांगितले. आपले राजकीय आयुष्य संघर्षात गेले आहे. 30 वर्षात प्रथमच जनतेने आपल्याला आमदार म्हणून निवडून दिले आहे. मी त्याकडे संधी म्हणून पहातो. मतदारांनी जी संधी दिली आहे त्याचा फायदा घेत जे जे शक्य ती कामे करण्याचे आपले प्रय} आहेत. गेल्या अडीच वर्षाच्या काळात याच भुमिकेतून मतदार संघातील रखडलेल्या विकास प्रकल्पांचा सातत्याने मुख्यमंत्री, अर्थमंत्री व संबधीत विभागाचे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करीत आलो. सरकारनेही त्याला साथ दिली. त्यामुळे अनेक विकासाची कामे आपण राबवू शकलो. ज्या ज्या वेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली त्या त्या वेळी आपण मतदार संघातील विकास कामांसाठी निधी मंजुर करून घेतला. स्थानिक पातळीवर देखील अनेक अडथळे असतात, ते अडथळे ज्या पद्धतीने सोडविता येतील त्या पद्धतीने सोडविले. त्यासाठी काही वेळा चौकटीबाहेर जावून काम करावे लागले. पण जनतेच्या सेवेसाठी आणि विकासासाठी ते कामही आपण केले त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.