लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा मतदारसंघासाठी नियुक्त कर्मचा:यांचे दुसरे प्रशिक्षण झाले. कर्मचा:यांना विविध बाबींचे प्रशिक्षण यावेळी निवडणूक निर्णय अधिका:यांतर्फे देण्यात आले. यावेळी देखील तब्बल 49 कर्मचारी गैरहजर होते. कर्मचा:यांचे द्वितीय प्रशिक्षण शनिवारी संपन्न झाले. खेतीया रोडवरील मीरा प्रताप लॉन्समध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. रँडमली एकुण 1,496 कर्मचारी यावेळी दोन सत्रातील प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी यावेळी मतदानपूर्व दिवशी साहित्य स्वीकारणे, मतदान केंद्रावरील बुथची रचना, इव्हिएम हाताळणी, अभिरूप मतदान, चाचणी मतदान, मतदानाच्या हिशेब, केंद्राध्यक्ष दैनंदिनी आदी विविध नमुने, साहित्य जमा करणे या संदर्भाने निवडणूक कामकाजाबद्दल मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबी चित्रफीतींद्वारे दाखवण्यात आल्या. नंतर कर्मचा:यांना मतदान यंत्रेदेखील सरावाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. निवडणुक कामकाजविषयक पुस्तिकांचे यावेळी वाटप करण्यात आले. कर्मचा:यांच्या मतदानाकरिता पुरविण्यात आलेल्या टपाली मतपत्रिकांवर मतदान करणेकामी सुविधा कक्ष यावेळी सज्ज ठेवण्यात आला होता. या प्रशिक्षणात 49 कर्मचारी गैरहजर होते. यावेळी क्षेत्रिय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.मिलिंद कुलकर्णी, पंकज लोखंडे व श्रीकांत लोमटे उपस्थित होते.
शहाद्यातही 49 कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 12:38 IST