शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

१६९ बालकांच्या ‘धडधडी’ला शस्त्रक्रियेतून वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:17 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सुविधा आणि यंत्रणाचा अभाव असल्याचा फटका जन्माला येणाऱ्या बाळांनाही बसत ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सुविधा आणि यंत्रणाचा अभाव असल्याचा फटका जन्माला येणाऱ्या बाळांनाही बसत असून नवजात बालकांच्या ह्रदयातील धडधडीसोबतच येणाºया आवाजांचे परीक्षण करणारी ‘टू डी ईको’ ही यंत्रणाच जिल्ह्यात नसल्याने उपचारासाठी बालकांना परराज्यात घेऊन जाण्याची वेळ पालकांवर येत आहे़ एकीकडे हे निराशाजनक चित्र असताना बाहेरुन टू डी ईको करुन आलेल्या ३०० पैकी १६९ नवजात बालकांवर आरोग्य विभागाच्या प्रयत्नांनी मुंबईतल्या महागड्या रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया करुन त्यांच्या ‘धडधडीला’ वेग देण्याचे कार्यही झाले आहे़जिल्ह्यात २०११ ते २०१९ दरम्यान तब्बल ३०० बालकांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या ह्रदयात दोष निर्माण झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ आली होती़ यातील १६९ बालकांच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाल्या आहेत़ तर उर्वरित बालकांवर टप्प्याटप्प्याने उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत़जन्माला येणाºया प्रत्येक नवजात बालकाचे ह्रदय हे साधारण आठवडाभराच्या काळात पूर्णपणे विकसित होते़ यानंतरही तपासणी दरम्यान काहींच्या ह्रदयातून आवाज येणे थांबत नसल्यास त्याच्यावर प्राथमिक स्तरातील ‘टू डी ईको’ ही चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येतो़ जिल्ह्यात सर्व सोयींनी युक्त असे शासकीय आणि खाजगी दवाखाने असले तरी लहान बालकांसाठीची ‘टू डी ईको’ साठी स्वतंत्र अशी कोणतीही व्यवस्था नाही़ परिणामी जिल्ह्यातील पालकांवर बाळाच्या ह्रदय तपासणीची वेळ ओढावल्यास अतिरिक्त खर्च करुन जिल्ह्याबाहेर अर्थात गुजरात राज्यात जावे लागत आहे़ यातून आतापर्यंत बाळ दगावण्याचा अनर्थ घडलेला नसला तरी हा सर्व खर्च गोरगरीब पालकांना परवडणारा नसल्याने त्यांची परवड होते़ यातही टूडी ईको ही चाचणी केल्यानंतर ह्रदयातील झापड उघडणे किंवा बंद होण्याच्या क्रियांमध्ये अनियमितता आढळून आल्यास मग शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो़ या शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था मुंबई येथे आहे़ याठिकाणी जाण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून पालकांना सहकार्य करण्यात आल्याने शस्त्रक्रिया झाल्याचे सांगण्यात आले आहे़ यातही रोजगारासाठी पालक स्थलांतरीत झाल्याने ११ बालकेही उपचाराअभावीच परराज्यात गेल्याने त्यांच्यावरील उपचार रखडले आहेत़साधारण १ दिवस ते साडेसात वर्षांच्या चिमुरड्यांच्या ह्रदयात आवाज येण्याच्या प्रक्रिया सुरुच राहिल्यास त्याच्या शस्त्रक्रिया करुन ह्रदयातील उघडे असेलेले व्हॉल्वस योग्य पद्धतीने काम करतील अशी स्थिती निर्माण केली जाते़ उपचार पूर्ण होईपर्यंतच्या काळात बाळांचे रडणे वाढणे, वजन न वाढणे, भूक न लागणे यासह इतर किरकोळ आजार वाढीस लागतात़ यातही गंभीर ह्रदयरोग असल्याने शरीर निळे पडण्यासह विविध लक्षणे दिसून येतात़ यातून पालकांनी योग्य वेळी योग्य उपचार आणि रुटीन तपासण्या पूर्ण करण्याची गरज असल्याने जिल्हा रुग्णालयात टूडी ईको हे मशिन आणि लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ यांची नेमणूक करणे गरजेचे ठरत आहे़नंदुरबार जिल्ह्यात २०१३-१४ ते २०१८-१९ या कालावधीत ३०० नवजात बालकांच्या ह्रदयात दोष असल्याचे दिसून आले होते़ या सर्वांची टू डी ईको टेस्ट केल्यानंतर त्यांना शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरवून त्यातील १६९ बाळांच्या ह्रदय शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत़ जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१३-१४ मध्ये ६४, २०१४-१५ मध्ये ५३, २०१५-१६ या वर्षात ४३, २०१६-१७ या वर्षात २७, २०१८-१९ या वर्षात ३१ तर २०१९-२० या चालू वर्षात नोव्हेंबरपर्यंत सात बालकांना ह्रदयात समस्या असल्याचे समोर आले होते़ एकूण ३०० बालकांच्या या समस्येवर मार्ग काढत जिल्हा रुग्णालयाने त्यांच्यावर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळवून देत त्यातील १६९ नवजात बालकांच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना नवजीवन दिले आहे़उर्वरित १२१ बालकांवर उपचार सुरु असून ते जिल्हा रुग्णालयाच्या सपंर्कात आहेत़गर्भलिंगनिदान कायद्यांतर्गत सोनोग्राफी मशिनच्या वापरावर अनेक बंधने आहेत़ याच सोनोग्राफी मशिनसारखे टू-डी ईको हे लहान मुलांच्या ह्रदयाची तपासणी करणारे मशिन आहे़ परंतू पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत त्याच्या परवानग्या मिळवण्यातच मोठा वेळ जात असल्याने जिल्ह्यातील एकाही डॉक्टरांकडे अद्याप या मशिनची सोय नाही़ एकदोन ठिकाणी मशिन असले तरी डॉक्टर चोवीस तास नाहीत अशी गत आहे़ कायद्याची बंधने ही खाजगी डॉक्टरांना असली तरी सरकारी दवाखान्यातही हे मशिन उपलब्ध नाही़ शासकीय रुग्णालयातील बालकांच्या तपासण्या करण्यासाठी खाजगी रुग्णालयात पाठवले जात आहेत़ याबाबत संबधितांनी पाठपुरावा करत असल्याची माहिती दिली असून त्याला यश येण्याची खात्री नाही़मुंबई येथील कोकिलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट व ज्युपिटर हॉस्पिटल येथे दोन ठिकाणी बालकांच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करण्याची सोय आहे़ जिल्हा रुग्णालयात ह्रदयरोगग्रस्त बालक दाखल झाल्यास त्याच्यावर प्राथमिक तपासण्या करुन या दोन्ही ठिकाणी पाठवले जाते़ येथील शस्त्रक्रिया आणि उपचार या दोघांचाही खर्च आरोग्य विभागाकडून करण्यात येतो़ जिल्ह्यातील २५ बालकांच्या याठिकाणी वेळोवळी तपासण्या अद्याप सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे़