लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नगरपालिकेच्या दिनदयाळ अंत्योद योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यामाने रोजगार मेळावा शहरातील संताजी तैलिक मंगल कार्यालयात घेण्यात आला.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित पाटील होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते दीपप्रज्वालन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी कमला नेहरू कन्या विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य ज्ञानी कुलकर्णी यांना युवक-युवतींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आलेल्या उद्योजक कंपन्यांचे स्वागत करून युवक व युवतींना मोठय़ा संख्येने रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे सांगितले.हा मेळावा 677 रिक्त जागांसाठी घेण्यात आला. या वेळी आठ उद्योजकांनी आपली उपस्थिती दर्शविली. दरम्यान कंपनीच्या अधिकारी व कर्मचा:यांनी युवक-युवतींना कंपनीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी 438 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी 409 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. हा मेळावा सर्वासाठी खुला असल्याने मोठय़ा संख्येने युवक व युवतींनी उपस्थिती लावली होती.याप्रसंगी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, नगरसेविका संगिता मंदिल, शेख शमिमबी, शेख हकीम कुरेशी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, कार्यालय पर्यवेक्षक गजेंद्र सावरे, आस्थापना लिपीक चेतन गांगुर्डे, सहायक प्रकल्प अधिकारी प्रभाकर सोनार, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबारचे वरिष्ठ लिपिक मंगेश वाघ, सचिन दलाल, योगेश चौधरी, सुधाकर भावसार, योगेश जयस्वाल, अमोल बोरदे, राकेश जयस्वाल, नंदकुमार संगपाळ, राहुल भामरे, मालवी भावसारी, उमेश भावसार, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, अंजना मगरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी प्रभाकर सोनार तर आभार कार्यालय पर्यवेक्षक गजेंद्र सावरे यांनी मालने.
रोजगार मेळाव्यात 409 युवकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 12:15 IST