शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

40 कोटींचा अर्थसंकल्प मंजुर : नंदुरबार जिल्हा परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:05 IST

पंचवार्षीकमधील शेवटचा अर्थसंकल्प

लोकमत ऑनलाईननंदुरबार : जिल्हा परिषदेचा चालू पंचवार्षिकमधील शेवटचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. 40 कोटी 63 लाख रुपये एकुण खर्चाच्या अंदाजपत्रकात जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेची विशेष सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आली. यावेळी अर्थ समिती सभापती दत्तू चौरे यांनी 2018-19 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यासह सभापती व अधिकारी उपस्थित होते.यंदाचे अंदाजपत्रक 40 कोटी 63 लाख रुपयांचे आहे. त्यात 20 टक्के समाज कल्याण विभागास मुळ तरतूद सव्वा कोटी रुपयांची उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने मागासवर्गीयांच्या वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजनांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. 10 टक्के महिला व बालकल्याण विभागास मुळ तरतूद 75 लाख रुपये उपलब्ध करण्यात आली आहे. महिलांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अपंग कल्याणसाठी 33 लाख रुपये तर जलयुक्तसाठी एक कोटी 50 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. शेतक:यांच्या सर्वागीन विकासाकरीता कृषी विभागास एक कोटी 30 लाख रुपयांचा खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते परिक्षणासाठी सात कोटी 30 लाख रुपये तर पदाधिकारी व सदस्य यांचे मानधन, वाहन इंधन, दुरूस्तीसाठी पाच कोटी 15 लाख रुपयांची तरतूद आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये लाभाथ्र्याचा हिस्सा समाविष्ट केल्यास योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होईल. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या अनुदानातून सर्व विभागांनी वैयक्तिक लाभाच्या योजना राबवितांना मागासवर्गीय लाभाथ्र्यासाठी 90 टक्के अनुदानावर व सर्वसाधारण लाभाथ्र्यासाठी 75 टक्के अनुदानावर योजना राबविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असल्याचे अर्थ समिती सभापती दत्तू चौरे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे यंदाच्या पंचवार्षीकमधील शेवटचा अर्थसंकल्प होता.