शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

21 हजार विद्याथ्र्यासाठी 40 केंद्र

By admin | Updated: March 7, 2017 00:23 IST

दहावी परीक्षा : कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमे:यांचीही घेणार मदत

नंदुरबार : जिल्ह्यातील 40 परीक्षा केंद्रांमधून 21 हजार 383 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यासाठीची तयारी माध्यमिक शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सरसावले असून विविध उपाययोजनादेखील करण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी सीसीटीव्हीचीदेखील निगराणी राहणार आहे.दहावीच्या परीक्षांना मंगळवार, 7 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यंदादेखील कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्या यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. त्यासाठी प्रसंगी कठोर भूमिकादेखील घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ापासून सुरू झालेल्या बारावी परीक्षादेखील सुरळीत सुरू असल्यामुळे दहावीच्या परीक्षादेखील त्याच मुक्त आणि कॉपीविरहित वातावरणात पार पडतील अशी अपेक्षा माध्यमिक शिक्षण विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.तालुकानिहाय परीक्षार्थीजिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 21 हजार 383 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत.  त्यांच्याकरिता एकूण 40 परीक्षा केंद्रांची सोय करण्यात आली आहे. तालुकानिहाय परीक्षार्थी व त्यांच्यासाठी असलेल्या परीक्षा केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे- नंदुरबार तालुक्यातून एकूण सहा हजार 59 विद्यार्थी परीक्षेला बसले असून 13 परीक्षा केंद्र राहणार आहेत. नवापूर तालुक्यातून चार हजार 26 विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यांच्यासाठी     नऊ केंद्रांची सोय करण्यात आली आहे. शहादा तालुक्यात सर्वाधिक पाच हजार 243 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यांच्यासाठी 19 परीक्षा केंद्र राहणार आहेत. तळोदा तालुक्यात  दोन हजार 29 विद्यार्थी असून तीन परीक्षा केंद्र राहणार आहेत. अक्कलकुवा तालुक्यात दोन हजार 492 विद्यार्थी असून त्यांच्याकरिता तीन परीक्षा केंद्र व धडगाव तालुक्यासाठी 1534 विद्यार्थी प्रविष्ट असून तेथेही तीन परीक्षा केंद्र कार्यान्वित राहणार आहेत.भरारी पथकेदहावीच्या परीक्षेसाठी सहा तालुक्यांसाठी सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय शिक्षणाधिकारी यांच्यासह त्या त्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हेदेखील वेळोवेळी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथकदेखील कार्यान्वित राहणार आहे. आधीच बारावी परीक्षेसाठीदेखील पथके तयार करण्यात आलेली आहेत.मनाई आदेशपरीक्षा केंद्र परिसराच्या 200 मीटरच्या आत मनाई आदेश यापूर्वीच लागू करण्यात आले आहेत. परीक्षार्थ्ीशिवाय इतर कुणालाही त्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी राहणार आहे. याशिवाय परिसरातील ङोरॅाक्स सेंटरदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.सीसीटीव्हीचा वॉचअनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे कॉपी रोखण्यासाठी त्यांचाही आधार घेतला जाणार आहे. बाहेरून कॉपी पुरविणा:यांचा त्रास यामुळे कमी होण्याची शक्यता आहे. शाळेच्या आतमध्ये असलेल्या कॅमे:यांची दिशा बाहेरच्या बाजूला बदलवून बाहेरून कॉपी पुरविणा:यांच्या समस्येवर उपाय केला जाणार आहे. तशा सूचना ज्या शाळेत सीसीटीव्ही लावण्यात आले आहे त्या शाळांना देण्यात आल्या आहेत.काही परीक्षा केंद्रांमध्ये  समस्यांचा त्रास विद्याथ्र्याना           सहन करावा लागणार आहे. बसण्यासाठी बाकांची पुरेशी आणि व्यवस्थित व्यवस्था नसणे, वर्गामध्ये पंख्याची सोय नसणे, पिण्याचे पाणी यासह इतर समस्या राहण्याची शक्यता आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात बाहेरून कॉपी पुरविणा:यांचा मोठय़ा प्रमाणावर त्रास होतो. केंद्र व्यवस्थापन, कर्मचा:यांसह विद्यार्थीही अशा प्रकारांमुळे हैराण होतात. त्यामुळे बाहेरून कॉपी पुरविणा:यांना प्रतिबंध करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.