लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वीज वितरण कंपनीच्या लाईनमन आणि वायरमनांकडून राज्यस्तरावर सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले आहे़ यामुळे वीज दुरूस्तीची कामे खोळंबली असून शहरातील ३६ कर्मचारी सध्या रजेवर असल्याची माहिती देण्यात आली आहे़लाईनमन व वायरमनांकडून १० ते १२ आॅगस्ट दरम्यान सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला गेला होता़ सोमवारी हे आंदोलन सुरू झाले़ परिणामी सोमवारपासून शहरात वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर दुरुस्ती करुन तो पूर्ववत करण्याची कामे थांबली होती़ या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रभारी कार्यकारी अभियंता मनिषा कोठारी यांनी पर्यायी कर्मचारी सोबत घेत ठिकठिकाणी दुरूस्तीची कामे पूर्ण केली होती़ बुधवारी आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे़ कंपनीने पर्यायी कर्मचारी नियुक्त केले आहेत़ दरम्यान मंगळवारी काही शासकीय कार्यालयात दिवसभर वीज पुरवठा बंद असल्याने कामकाज होवू शकले नव्हते़
शहरात वीज कंपनीचे ३६ वायरमन सामूहिक रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 12:39 IST