लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 22 रोजी नंदुरबारातील श्रीकृष्ण नगरात घडली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नंदुरबारातील होळ शिवारातील श्रीकृष्णनगरात राहणारे नरेंद्र अरविंद देसाई हे बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी रोख 25 हजार रुपये, तीन घडय़ाळ व एक मोबाईल असा एकुण 35 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. याबाबत नरेंद्र देसाई यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पवार करीत आहे. दरम्यान, शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी शहराबाहेरील व लगतच्या वस्तीमधील नागरिकांनी केली आहे.
नंदुरबारातील घरफोडीत 35 हजारांचा ऐवज चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:02 IST