शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांचा अनुभव व कार्य हाच प्रचाराचा मुद्दा : आमदार के.सी.पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:26 IST

एकसंघतेने काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरा जातोय

नंदुरबार : आमदार या नात्याने ३० वर्षे शहादा, अक्कलकुवा आणि धडगाव या विधानसभा मतदारसंघात केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत. त्यामुळे या कामाच्या बळावर आणि काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष आणि दलित, आदिवासी समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्याच्या सहकार्याने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातूून निवडणूक लढवत असल्याची माहिती काँग्रेसचे उमेदवार आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.‘लोकमत’च्या ‘चाय पे चर्चा’ उपक्रमात सहभागी झालेल्या आमदार अ‍ॅड.पाडवी यांनी काँग्रेसची उमेदवारी, प्रचाराचे मुद्दे, लोकसभा मतदारसंघासाठीचे व्हीजन, संघटनात्मक प्रयत्न याविषयी बातचित केली.प्रश्न : आमदार असताना लोकसभा निवडणुकीकडे वळण्याचे कारण ?आ.के.सी.पाडवी : नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. इंदिराजी गांधी या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात या मतदारसंघापासून करीत असत. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले. परंतु, गेल्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून गेला. तो पुन्हा मिळविण्यासाठी सर्व नेत्यांनी माझे नाव एकमताने सुचविले. पक्षाचा निष्ठावंत सैनिक या नात्याने मी तो आदेश शिरसावंद्य मानला आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो.प्रश्न : आपले प्रचाराचे मुद्दे काय राहणार आहेत?आ.के.सी.पाडवी : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाने केलेली कामे आणि गेल्या पाच वर्षात भाजपाच्या काळात झालेली कामे यांची तुलनात्मक स्थिती आम्ही मतदारांपुढे मांडणार आहोत. ज्येष्ठ नेते स्व.पी.के.अण्णा पाटील यांच्या सान्निध्यात राहण्याचा योग आला. त्यामुळे सिंचनाच्या कामाची दृष्टी मला मिळाली. विधानसभा मतदारसंघात सिंचनाची मोठी कामे मी करु शकलो. तेही मांडणार आहोत.प्रश्न : भाजपाच्या पाच वर्षातील कार्यकाळाचे मूल्यमापन लोकप्रतिनिधी आणि प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून तुम्ही कसे कराल?आ.के.सी.पाडवी : भाजपाच्या पाच वर्षातील कार्यकाळात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात कोणतेही भरीव काम झालेले नाही. ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली, कार्यादेश दिलेली विकास कामेच या पाच वर्षांत पूर्ण झाली आहेत. विद्यमान खासदार जुन्या कामांचे श्रेय स्वत: घेत आहेत. मात्र जनतेला सत्य माहिती आहे. त्यामुळे आम्ही आमच्या विकास कामांची माहितीच मतदारांपुढे नेणार आहोत. प्रमुख मुद्दा म्हणजे, वनविभागाच्या परवानगीसाठी अडून राहिलेली सिंचन, रस्ते आणि वीज प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न, त्याचा दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना झालेला लाभ, मुंबई ते दिल्लीपर्यंत केलेला पाठपुरावा हे सगळे जनतेपुढे असल्याने विरोधकांनी कितीही भूलथापा मारल्या तरी जनता काँग्रेसवर विश्वास ठेवेल, याची खात्री आहे. प्रश्न: नंदुरबार आणि कॉंग्रेसचे ऋणानुबंध या मुद्यावर भर राहील ?आमदार के.सी.पाडवी : निश्चितच. आदिवासी जनतेने माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्यावर अलोट प्रेम केले. गांधी परिवार आणि कॉंग्रेस पक्षाने आदिवासी जनता आणि येथील मतदारांना भरपूर काही दिले. या ऋणानुबंधाला पुन्हा उजाळा दिला जाईल.

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबार