नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील 28 जणांना झाली डेंग्यूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:52 AM2019-10-15T11:52:27+5:302019-10-15T11:52:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले 28 रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरु ...

28 people in the district, including Nandurbar city, got dengue infection | नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील 28 जणांना झाली डेंग्यूची लागण

नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील 28 जणांना झाली डेंग्यूची लागण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले 28 रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ आरोग्य यंत्रणांनी संकलित केलेल्या रक्तनमुने तपासणीनंतर ही आकडेवारी समोर आली आह़े        
नवापुरपाठोपाठ गेल्या दोन आठवडय़ांपासून नंदुरबार शहरात डेंग्यूचा फैलाव झाला आह़े यात 18 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्यानंतर नगरपालिका, हिवताप आणि आरोग्य विभाग यांच्याकडून शहरात जनजागृती व रासायिक औषध फवारणी सुरु करण्यात आली होती़ नंदुरबार पालिकेने गेल्या चार दिवसात शहराचे चार विभाग करुन फवारणी केली आह़े यात सिंधी कॉलनी ते राजेंद्र नगर भाग 1, जुना बैल बाजार ते अलीसाब मोहल्ला भाग 2, साक्री नाका ते बागवान गल्ली, रायसिंग पुरा ते अहिल्याबाई विहिर भाग 3 आणि गाजीनगर ते गांधीनगर भाग 4 येथे औषध फवारणी करणयात आली आह़े तब्बल 150 ठिकाणी फवारणी करुन कर्मचा:यांनी जनजागृती केली होती़ 
आरोग्य यंत्रणेकडून डेंग्यूचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असताना जिल्ह्यातील 368 जणांचे रक्तनमुने संकलित करण्यात आले होत़े यात 22  जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होत़े यात 19 नवापुर, नंदुरबार 3, शहादा 1 तर तळोदा शहरात दोघे डेंग्यूने बाधित असल्याचे सांगण्यात आले आह़े 
गेल्या दोन दिवससात आरोग्य यंत्रणेने एका खाजगी रुग्णालयात केलेल्या सव्रेक्षणात 19 जण दाखल असल्याचे समोर आले होत़े यातील 6 जणांना डेंग्यूची बाधा झाल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान रविवारी खासदार डॉ़ हीना गावीत यांनाही डेंग्यूची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्यांच्या खोडाई माता रोडवरील निवासस्थान व परिसरात स्वच्छता करुन तपासणी करुन स्वच्छता केल्याची माहिती देण्यात आली आह़े याठिकाणी डेंग्यूचे डास आढळून आलेले नसल्याचे सांगण्यात आल़े 
 

Web Title: 28 people in the district, including Nandurbar city, got dengue infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.