शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
5
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
6
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
7
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
8
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
9
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
10
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
11
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
12
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
13
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
14
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
15
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
16
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
17
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
18
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
19
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
20
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!

३१५ कोविड बेडसाठी २६ डॉक्टर नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी तीन कोविड सेंटर निर्माण करुन ३१५ बेडची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी तीन कोविड सेंटर निर्माण करुन ३१५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ या प्रत्येक सेंटरवर सात दिवसांसाठी सात डॉक्टर नियुक्त असून एकूण २६ डॉक्टरांवर कोविड कक्षांची भिस्त आहे़राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोरोना संसर्गबाधितांचे प्रमाण हे नंदुरबारात आजतरी मर्यादित आहे़ यातून आरोग्य सेवेवर खूप मोठा ताण आलेला नाही़ परंतू डॉक्टरांच्या नियुक्त्या करणे आणि त्यांच्याकडून सेवा करवून घेण्यात मात्र आरोग्य यंत्रणेला अडचणी असल्याचे चित्र असून जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारित असलेल्या ८९ डॉक्टरांना वेळोवेळी कोविड कक्षांमध्ये नियुक्त करण्यात येत असून ही संख्या अपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे़ कोविड कक्षांमध्ये डॉक्टर व्यस्त होत असल्याने जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांच्या ओपीडीवर त्याचा परिणाम जाणवत असल्याचे चित्र आहे़

१नंदुरबार येथील कोविड हॉस्पिटलमध्ये १२० बेडची सोय आहे़ याठिकाणी आयसीयूचे २६, आयसोलेशन ३२ तर नर्सिंग कॉलेजमध्ये ६२ बेड आहेत़ या सर्व १२० बेडसाठी १ एमडी, ३ एमबीबीएस व एक एमडी भूलतज्ञ अशा पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सोबत १२ स्टाफनर्स नियुक्त आहेत़२एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल येथील कोविड केअर सेंटरमध्ये १३५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ यासाठी दररोज १ एमबीबीएस, तीन बीएमएमस तर १२ स्टाफनर्स अशा १६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते़३शहादा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये सात दिवस १ एमबीबीएस, ३ बीएमएमएस डॉक्टर तर १० स्टाफनर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे़

जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्ष तसेच एकलव्य कोविड केअर सेंटर याठिकाणी १४१ तर शहादा येथील कक्षात ५१ असे १९३ रुग्ण उपचार घेत आहेत़जिल्ह्यात आजअखेरीस ६५३ जणांना लागण झाली होती़ यातील ४०१ रूग्ण हे उपचार घेऊन घरी परतले आहेत़ तिन्ही कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णात नंदुरबार येथील ११९, शहादा ४९, तळोदा १५, नवापूर ७ तर अक्कलकुवा येथील दोघांचा समावेश आहे़जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात पाच, एकलव्य केअर सेंटरमध्ये ४ तर शहादा येथे ४ अशा १३ जणांचे पथक उपचार देण्यासाठी तैनात करण्यात येते़ सात दिवस हे अधिकारी याठिकाणी कार्यरत असतात़ सात दिवसांची ड्यूटी संपल्यानंतर त्यांना सात दिवस त्याच भागात क्वारंटाईन करुन स्वॅब टेस्ट करुन घरी सोडण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़

एकीकडे डॉक्टरांची मर्यादित संख्या असताना १० कोरोना बेडसाठी १ सिस्टर अशी तरतूद केल्यास बाधितांवर उपचार सोपे होतात़ मात्र तूर्तास जिल्ह्यातील कोविड सेंटर्समध्ये २० बेडमागे एक सिस्टर अर्थात परिचारिका काम करत असल्याचे दिसून आले आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारित असलेल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये गेल्या २१ वर्षात वैद्यकीय अधिक्षकांची पदे न भरणे आता त्रासदायक होत असून प्रभारी राजमुळे या रूग्णालयांचे कामकाज ऐन कोरोना काळात अडचणीत येत असल्याची माहिती समोर आली आहे़