शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 254 शाळा क्रीडांगणाच्या प्रतिक्षेत

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: December 29, 2017 13:19 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे राज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध क्रीडा उपक्रमांचा गवगवा करण्यात येत आह़े परंतु प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील तब्बल 254 शाळांना क्रीडांगणच नसल्याचे समोर आले आह़े त्यामुळे एकीकडे मराठी शाळांमध्ये क्रीडांगण नसताना नवनवीन उपक्रमांचा उदोउदो कशासाठी असा ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे राज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध क्रीडा उपक्रमांचा गवगवा करण्यात येत आह़े परंतु प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील तब्बल 254 शाळांना क्रीडांगणच नसल्याचे समोर आले आह़े त्यामुळे एकीकडे मराठी शाळांमध्ये क्रीडांगण नसताना नवनवीन उपक्रमांचा उदोउदो कशासाठी असा प्रश्न आता पालकांकडून विचारण्यात येत आह़े जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची सख्या एकूण 1 हजार 393 इतकी आह़े त्यापैकी 235 शाळांना क्रीडांगण नसल्याची माहिती आह़े तर, दुसरीकडे माध्यमिक विभागाच्या एकूण 406 शाळांपैकी 19 शाळांना क्रीडांगण नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ़ राहुल चौधरी यांनी सांगितल़े त्यामुळे जिल्ह्यातील 254 मराठी शाळांना आपल्या हक्काचे क्रीडांगण नसल्याने अंगी प्रतिभा असूनही येथील खेळाडूंना भौतिक सुविधांअभावी आपल्या डोळ्यातील स्वपA पुर्ण करण्यास अडचणी येत आह़े प्राथमिक शिक्षण, क्रीडा यापासूनच भाविष्यातील खेळाडू, सशक्त पिढीची निर्मिती होत असत़े परंतु शिक्षणाच्या पहिल्या पायरीवरच विद्याथ्र्याना आवश्यक भौतिक सोयी-सुविधा मिळत नसल्याने यातून भावी पिढी कशी काय निर्माण होणार असा प्रश्न उपस्थित होत आह़े क्रीडांगण नसल्यामुळे अनेक होतकरु विद्याथ्र्याना आपल्या आवडीच्या खेळांचा आनंद घेता येत नाही़ अनेक खेळाडून शाळेपासून कोसोदुर क्रीडांगणाच्या शोधात फिरत असतात़ त्यामुळे त्यांची यातून मोठी हेडसांडही होत असत़े उपक्रमांचा होतेय उदोउदोराज्य शासनाकडून चला खेळूया, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत़ परंतु एकीकडे जिल्ह्यातील 254 शाळा व शेकडो विद्यार्थी कुठलाही  क्रीडा प्रकार खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रीडांगणापासूनच वंचित रहावे लागत  असताना नवनवीन उपक्रमांचा उदोउदो कशासाठी? असा प्रश्न विचारत आहेत़ जिल्ह्यात मोठय़ा संख्येने आदिवासी विद्यार्थी आहेत़ आधिच जेमतेम शिक्षणाचा खर्च उचलने त्यांना शक्य होत असत़े त्यामुळे  मराठी शाळांमध्येच प्रवेश घेण्याची त्यांची क्षमता असत़े खाजगी शाळांचा शुल्क, डोनेशन त्यांना परवडणारा नसतो़ शासनाचे उपक्रम हे खाजगी शाळांमध्ये राबविणे शक्य असल्याने मराठी शाळेतील विद्यार्थी मात्र या उपक्रमांपासून काही अंशी वंचितच म्हणावा लागेल़ त्यामुळे मराठी शाळांमधील विद्याथ्र्याच्या कलागुणांना वाव मिळत नाही़शेतशिवारात होतोय सराव.जिल्ह्यातील अनेक होतकरु विद्याथ्र्यी विविध खेळात पारंगत आहेत़ परंतु क्रीडांगणाअभावी त्यांना विविध खेळांचा सराव करणेही शक्य होत नाही़ त्यामुळे ते शेतशिवारातच आपल्या खेळाचा सराव करताना दिसून येत असतात़ नंदुरबार जिल्ह्यातील अनेक खेळाडू प्रतिभासंपन्न आहेत़ याआधिही जिल्ह्यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या क्रीडा कौशल्यामुळे त्यांनी नावलौकिक मिळवले आह़े परंतु अजूनही पाहिजे त्या प्रमाणात भौतिक सुविधा मिळत नसल्याने याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची आवश्यकता आह़े