शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

कोवीड योध्यांसाठी २५ लाखाची मदत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत जिल्हाभरात कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत जिल्हाभरात कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाशी लढणाऱ्या संपूर्ण यंत्रणेला कोरोना योद्धये असे संबोधून या योद्यांसाठी सानुग्रह अनुदान म्हणून २५ लाख रुपये मदत देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सीमा पद्माकर वळवी यांनी दिली.जिल्हा परिषदेतर्फे कोरोना पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी.सी., उपाध्यक्ष अ‍ॅड. राम रघुवंशी, बांधकाम समिती सभापती अभिजित पाटील, आरोग्य व शिक्षण समिती सभापती जयश्री पाटील, समाजकल्याण समिती सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे यांच्यासह पदाधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.सीमा पद्माकर वळवी यांनी सांगितले, आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषीत केले असून, या संकटावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या अधिकारी व कर्मचाºयांचे मनोबल वाढविण्यासाठी व हे कर्मचारी बाधीत रुग्णांच्या प्रत्यक्ष सहवासात येत असल्याने कर्मचाºयांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्यांच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यासाठी कोरोना योद्धये सानुग्रह अनुदान ही योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यांत येत आहे.कोरोनामुळे मयत होणाºया जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाºयांच्या वारसांना २५ लाख रुपये अर्थसहाय्य्य उपलब्ध करुन देण्यांत येणार आहे. साथरोग अधिनियम १८९७ अंतर्गत साथरोग आटोक्यात येईपर्यंत किंवा ३० जुलै २०२० पर्यंत मृत्यू पावणाºया व कोरोना बाधीत रुग्णांच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष कार्यरत असणाºया अधिकारी व कर्मचाºयांसाठी ही योजना लागू राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगीतले कि, जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनापासून बचावा बरोबरच रोजगार उपलब्ध करून देणे, गावागावात स्वच्छता ठेवून निजंर्तुकीकरण प्रक्रिया राबविणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे, अशा विविध कामांचा समावेश आहे. कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या या सर्वांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करणे, स्वच्छता मोहीम राबविणे, आरोग्याची काळजी घेणे, अशी विविध कामे केली जात आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात निजंर्तुकीकरणासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फवारणी करून घेण्यात आली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी गावातील नागरिकांना मास्क व सॅनीटायझर वाटप केले आहे.जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत करणे, गावांत ग्रामरक्षक दलाची स्थापना करणे तसेच रोजगार हमी योजने अंतर्गत कामे सुरु करणे, स्वस्तधान्य धान्य दुकानांच्या माध्यमातुन जिवनावश्यक वस्तुचा सुरळीत पुरवठा करणे, अशी विविध कामे केली जात आहेत. यासाठी संपूर्ण जिल्हा परिषद यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने अहोरात्र काम करत आहे.जिल्हा परिषद उपाध्यक्ष अ‍ॅड. राम रघुवंशी यांनी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात असून, आजमितीस जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या ५,७२१ कामांवर ३०,९९६ अकुशल मजूर कार्यरत आहेत. यामध्ये २६१ सार्वजनिक कामांवर ८,५४२ मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्ह्यात ५९,९०८ कामांना प्रशासकीय मान्यता घेण्यात आली असून, मजुरांना २३८ रुपये रोज या दराने मजुरी अदा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी सांगितले कि, शासनाच्या सूचनांनुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये बांधकामाची आरोग्य विभागातील व इतर विभागातील अत्यावश्यक कामे वगळता कोणतीही नवीन कामे प्रस्तावित नसून, गेल्या आर्थिक वषार्तील प्रगतीपथावर असलेली व लॉकडाऊनमुळे बंद पडलेली विकास कामे पूर्ण करून घेण्यासाठी नियोजन केले जात आहे.

जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभापती जयश्री पाटील यांनी, आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील गावागावांत युध्द पातळीवर कामकाज सुरू असून, जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यातच कोरोना बाबत प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात प्रत्येक गावांत जनजागृती साहित्याचा पुरवठा करण्यात आला. आशा कार्यकर्ती व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून जनजागृती करण्यात आली. दहा ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले. जिल्ह्यातील सहा तालुका आरोग्य अधिकारी, १५२ वैद्यकीय अधिकारी, १०४ सहाय्यक वैद्यकिय अधिकारी, ५२ प्रशासन अधिकारी, ५१ औषध निर्माता, ७४ पुरुष आरोग्य सहाय्यक, ५३ स्त्रि आरोग्य सहायिका, १४० आरोग्य सेवक,३३० आरोग्य सेविका, २,३४२ अंगणवाडी कार्यकर्ती आणि १,८७२ आशा कर्मचारी व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.