लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील २२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अहवाल जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाले आहेत़ शुक्रवारी रात्री मिळालेल्या या अहवालात नंदुरबार २० तर शहादा आणि नवापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे़प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील तालुका आरोग्य कार्यालयासोबत संबधित असलेले ५ सरस्वतीनगर १, मंजूळा विहार कोकणी हिल १, देसाईपुरा २, चौधरी गल्ली ४, पायल नगर १, परदेशीपुरा २, गांधी नगर ३, रायसिंगपुरा येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे़ नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे एक तर शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीतील एकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे़ सर्व रुग्णांना जिल्हा रुग्णालय व एकलव्या रेसिडेन्शियल येथील कोविड कक्षात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ नव्याने समोर आलेल्या २२ रुग्णांमध्ये ४ वर्षीय बालक ते ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे़ नव्याने समोर आलेल्या बाधितांमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही २४७ झाली आहे़
नंदुरबार जिल्ह्यातील २२ जणांना कोरोनाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 21:58 IST