शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील जिल्हा कृषी विभागात 201 पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 12:48 IST

पर्यवेक्षकांची 97 पद भरतीची प्रतिक्षा : विविध कामांवर परिणाम

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : राज्य शासनाकडून रिक्त पदांची भरती होत नसल्याने जिल्हा कृषी विभागात कामकाजावर परिणाम होत आह़े जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व इतर तालुका कार्यालयात तब्बल 201 पदे रिक्त असून यातून प्रभारी कामकाजाचा बोजा वाढत आह़े  राज्यशासनाकडून जिल्ह्यातील कृषी कार्यालयांसाठी 474 पदे मंजूर करण्यात आली होती़ वर्ग 1, 2, 3 आणि 4 या संवर्गातील पदांवर वेळावेळी अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे रिक्त राहिल्याने कामकाज थंडावत आह़े  जिल्ह्यातील 586 ग्रामपंचायतींच्या अखत्यारितील 952 गावांमध्ये शासनाच्या कल्याणकारी  योजना पोहोचवणा:या कृषी विभागाकडे 16 कृषी पर्यवेक्षक आणि 97 कृषी सहायक यांची पदे रिक्त आहेत़ गेल्या तीन वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये 30 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाल्याने त्यांच्या कामाचा भारही इतर कर्मचा:यांवर आला आह़े कृषी संचालनालय पुणे यांच्याकडे जिल्ह्यातील रिक्त पदांचा आढावा प्रशासनाकडून सातत्याने पाठवला जात आह़े राज्यात सर्वच ठिकाणी कर्मचा:यांची पदे रिक्त आहेत़ यातही जिल्ह्यात नियुक्ती मिळण्यासाठी उत्सुक असलेल्या 50 पेक्षा अधिक कर्मचा:यांच्या बदल्या स्थगित करण्यात आलेल्या असल्याचे सांगण्यात आले आह़े ग्रामीण भागात शेतक:यांच्या पिकपाणी सोबत रासायनिक खते, किटनाशके, फवारणी आणि इतर कृषीपयोगी योजनांची माहिती पडताळून पोहोचवणा:या कृषी पर्यवेक्षकांची 52 पदे मंजूर होती यातील 16 पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढल्याचे वेळावेळी सांगण्यात येत आह़े ग्रामीण भागात योजनांसोबत मार्गदर्शन कार्यक्रम रखडत असल्याचे मुख्य कारण रिक्त पदे असल्याचे सांगण्यात आले आह़े शेतक:यांच्या सर्वाधिक जवळ असलेल्या कृषी सहायकांची जिल्ह्यात 243 पदे निर्माण करण्यात आली होती़ यातील 97 पदे रिक्त आहेत़ उर्वरित 146 कृषी सहायक हे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये सेवा देत आहेत़ एका सहायकावर 15 ते 20 गावांचा भार असल्याने कामे आटोपतील कधी असा प्रश्न सातत्याने निर्माण होत आह़े कृषी विभागात विविध वाहनचालकांचे 10 पदे मंजूर आहेत़ यातील 6 रिक्त असल्याने 4 पदांवर भार आह़े रिक्त पदांमुळे योजनांची गती कमी असतानाच कृषी विभागाकडून चालवल्या जाणारी कार्यालये आणि उपक्रमांसाठीही कर्मचारी नसल्याचे दिसून आले आह़े यात कृषी विभागाच्या रोपवाटिकांमध्ये रोपमळा मदतनीस या पदाची निर्मिती झाली होती़ यात मंजूर झालेल्या 15 पैकी 14 पदे पूर्णपणे रिक्त आहेत़ वाटिकांच्या सुरक्षेसाठी तसेच कार्यालयांच्या सुरक्षेसाठी शिपाई आणि पहारेकरींची 52 पैकी 24 पदे रिक्त आहेत़ ही पदे कधी भरली जाणार याबाबत कृषी विभागाच्या अधिका:यांकडूनही ठोस अशी माहिती देण्यात आलेली नाही़ तूर्तास कंत्राटी कर्मचारी नियुक्त करून कामकाजाचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न सुरू आह़े