शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १९५ गावे खरीप अनुदानापासून वंचित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:59 IST

नंदुरबार : जून ते सप्टेंबर २०१८ या काळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने ५० पैश्यांच्या आत पैसवारी असतानाही धडगाव ...

नंदुरबार : जून ते सप्टेंबर २०१८ या काळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने ५० पैश्यांच्या आत पैसवारी असतानाही धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील १९५ गावांना दुष्काळ अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे़ या १९५ गावांमध्ये दुष्काळ जाहिर नसून केवळ दुष्काळसदृश स्थिती असल्याचा अहवाल असल्याने येथे केवळ सवलती लागू होणार आहे़२०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळीसदृश्य परिस्थिती असल्याने राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्यात आला होता़ यात नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोेदा या चार तालुक्यांचा समावेश होता़ चारही तालुक्यातील पर्जन्यमान आणि पीककापणी प्रयोगांच्या आधारे शासनाने हा दुष्काळ जाहिर केला होता़ याउलट धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात स्थिती होती़ पाऊस ७५० मिलीमीटरपेक्षा कमी होऊनही येथील पिकांची स्थिती सुरुवातीला काही प्रमाणात ठीक होती़ परंतू नंतर पाऊस न आल्याने येथील स्थिती दयनीय झाली़ याबाबत दोन्ही तालुक्यात पाठपुरावा करण्यात येत होता़ याची दखल घेत नोव्हेंबर २०१८ मध्ये अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा, खापर आणि अक्कलकुवा या तीन मंडळात दुष्काळ घोषित करण्यात आला होता़ यानंतर डिसेंबर अखेरीस अंतिम पैसेवारी घोषित झाल्यानंतर धडगाव ९९ तर अक्कलकुवा तालुक्यातील तीन मंडळातील ९६ गावे ही दुष्काळसदृश असल्याचे समोर आले होते़ यातून लोकोग्राहस्तव शासनाने दुष्काळसदृश घोषित केले होते़ यातून येथे आठ प्रकारच्या सवलती जाहिर झाल्या असल्या तरी या १९५ गावांमध्ये ‘दुष्काळ’ नसल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून देय असलेले खरीप अनुदान मिळणार नसल्याची माहिती आहे़ दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य या दोन शब्दातील खेळात दुर्गम भागातील शेतकरी भरडला जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे़