शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा निर्मितीच्या 19 वर्षानी नंदुरबारात बहुप्रतिक्षीत आयकर कार्यालय अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या आयकर भवन कार्यालयाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यामुळे आता जिल्ह्यातील करदात्यांची धुळे येथे होणारी फिरफिर थांबणार आहे.शहरातील रघुवंशीनगर भागातील भारती भवन येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पुणे क्षेत्राचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए.सी.शुक्ला यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला. यावेळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या आयकर भवन कार्यालयाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यामुळे आता जिल्ह्यातील करदात्यांची धुळे येथे होणारी फिरफिर थांबणार आहे.शहरातील रघुवंशीनगर भागातील भारती भवन येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पुणे क्षेत्राचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए.सी.शुक्ला यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला. यावेळी बोलतांना आयुक्त शुक्ला यांनी सांगितले. देशात आजही प्रामाणिकपणे आयकर भरणारे अनेकजण आहेत. परंतु काहीजण त्यापासून पळ काढतात. वास्तविक या करातूनच देशाची अर्थव्यवस्था चालते. कल्याणकारी योजनांना आणि देशाच्या रक्षण करणा:या सैन्यदलाच्या खर्चासाठी आयकराचाच पैसा सरकारला वापरावा लागतो. त्यामुळे कर चोरी करणे हा एक प्रकारे अपराधच आहे. त्यामुळे प्रत्येक करदात्याने प्रामाणिकपणे कर भरणा करून देशाप्रती आपली निष्ठा राखावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील करदात्या जनतेसाठी हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी दर बुधवारी पूर्व परवाणगीने अधिका:यांना भेटता येईल अशी सोय राहणार आहे. टप्प्याटप्याने अधिकारी व कर्मचा:यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी आयकर आपल्या दारी या उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरिष चौधरी, नाशिकचे मुख्य आयकर आयुक्त असिमकुमार, ठाण्याचे एन.एन.मिश्रा, प्रधान आयकर आयुक्त शंकरलाल मिना, औरंगाबादचे एस.डी.श्रीवास्तव, के.पी.सी.राव, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, धुळ्याचे आयकर आयुक्त लाला फिलीप्स, पृथ्वीराज रघुवंशी, किशोरभाई वाणी, आयकर आयुक्त मनोज गौतम, हेमंत लेऊवा, मोहित मृणाल, राजीव केसरवाणी यांच्यासह कर सल्लागार, व्यापारी व करदाते उपस्थित होते. अमित अग्रवाल, संतोष नानकाणी, मनिषा लुणावत, किशोरभाई वाणी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन श्रीराम देशपांडे यांनी केले. आभार पी.पी.महाजन यांनी मानले.