ट्रॅक्टर स्पेअरपार्टच्या रक्कमेत 18 लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:52 PM2019-11-08T12:52:04+5:302019-11-08T12:52:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ट्रॅक्टर व स्पेअरपार्ट विक्रीच्या रक्कमेत 18 लाख 42 हजार 449 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवापूर ...

18 lakh fraudulent in the amount of tractor sparepart | ट्रॅक्टर स्पेअरपार्टच्या रक्कमेत 18 लाखांची फसवणूक

ट्रॅक्टर स्पेअरपार्टच्या रक्कमेत 18 लाखांची फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ट्रॅक्टर व स्पेअरपार्ट विक्रीच्या रक्कमेत 18 लाख 42 हजार 449 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवापूर व शहादा येथील दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पंकज प्रकाश शिंपी, रा.नवापूर व हेमलभाई विनय गांधी, रा.शहादा असे दोघा संशयीतांची नावे आहेत.  नंदुरबार येथील स्वामी समर्थ ऑटो मोबाईल या ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये ही घटना घडली.  सुभाष भुक्कन वळवी यांच्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर व स्पेअरपार्ट विक्रीच्या रक्कमेबाबत नियमित हिशोब देण्यात आला. उर्वरित 18 लाख 42 हजार 449 रुपयांची रक्कम वळवी यांचा विश्वास संपादन करून ती देण्यास शिंपी व गांधी यांनी टाळाटाळ केली. शिवाय पोष्टाद्वारे धमकीची चिठ्ठी पाठवून ठार मारण्याची धमकी देखील दिली. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर सुभाष वळवी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पंकज शिंपी व हेमलभाई गांधी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक नंदवाळकर करीत आहे.    
 

Web Title: 18 lakh fraudulent in the amount of tractor sparepart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.