लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : 26 डिसेंबर रोजी सूर्यग्रहणाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या वतीने प्रबोधन मोहीम राबवली जाणार आहे. ग्रहण काळात ग्रहणाबाबत असणा:या विविध प्रकारच्या अंधश्रद्धांच्याविरोधात या मोहिमेत प्रबोधन केले जाणार असून सूर्यग्रहणाचा खगोलीय आविष्कार पाहण्यासाठी संघटनेकडून 15 हजार चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी नवापूर येथील जिल्हा बैठकीत दिली.महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीची बैठक नवापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए.जी. जयस्वाल तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य सरचिटणीस विनायक साळवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.के.बी. महाजन, श्रीकांत पाठक, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, प्रधान सचिव किर्तीवर्धन तायडे आदी उपस्थित होते. सुरुवातीला जिल्ह्यातील प्रमुख शाखांचा मागील चार महिन्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर शाखानिहाय संघटनात्मक व उपक्रमात्मक तसेच अडचणींवर चर्चा करण्यात आली. अंनिसच्या कामात महिला व युवकांचा सहभाग वाढावा यासाठी संघटनात्मक तसेच उपक्रमात्मक अडचणींवर मात करण्यासाठी आगामी काळासाठी कृतीकार्यक्रम बैठकीत ठरविण्यात आला. डिसेंबर महिन्यात सभासद नोंदणी करणे व शाखा कार्यकारिणी निवड प्रक्रिया राबवणे, किमान एका नवीन शाखेची निर्मिती करणे, शाखांना आवश्यक संघटना बांधणी वैचारिक व चमत्कार प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे, 24 ते 25 डिसेंबर व्यसनविरोधी सप्ताह, 3 जानेवारी ते 12 जानेवारी स्त्रीशक्ती जागर अभियान, 26 नोव्हेंबर ते 30 जानेवारी संविधान बांधिलकी महोत्सव आदी उपक्रम आयोजित करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीला जिल्ह्यातील तळोदा, नंदूरबार, नवापूर, शहादा, कळंबू शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीसाठी प्रा.के.बी, चव्हाण, प्रा.मुरलीधर उदावंत, प्रा.जयश्री चव्हाण, प्रा.हणमंत सरतापे, जयश्री पाटील, प्रतिक पाठक, मंगेश बेडसे, प्रदीप गावीत, अनिल गावीत, पंजाबसिंग यांच्यासह कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.
ग्रहणांच्या गैरसमजुतीविषयी अंनिसची प्रबोधन मोहिमेत शाळा-महाविद्यालयांमध्ये ग्रहण आणि अंधश्रद्धा याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. ग्रहणाच्या दिवशी गरोदर स्त्रियांनी ग्रहण काळात भाजी फळे न कापणे याचा प्रत्यक्ष कृतीतून विरोध करण्यात येणार आहे. ग्रहण शास्त्रीय चष्म्यातून पाहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रहण व अंधश्रद्धा याबाबत प्रबोधनासाठी पोस्टर प्रदर्शन भरविण्यात येईल. राज्यभर महाराष्ट्र अंनिसच्या वतीने ही प्रबोधन मोहीम राबविण्यात येणार आहे.