शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भगर-आमटीतून झाली १५० जणांना विषबाधा; रनाळेतील घटना, प्रकृती स्थीर

By मनोज शेलार | Updated: February 21, 2024 13:18 IST

मिळालेल्या माहितीनुसार, रनाळे येथे मंगळवारी रात्री बाळूमामा यांच्या नावाने भंडारा-महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

मनोज शेलारनंदुरबार : रनाळे, ता.नंदुरबार येथे मंगळवारी रात्री आयोजित भंडारा-महाप्रसादाच्या कार्यक्रमात अन्नातून विषबाधा झाल्याने दीडशेपेक्षा अधीक जणांना त्रास जाणवू लागला होता. त्यातील १०० पेक्षा अधिक जणांवर उपचार करून लागलीच घरी सोडून देण्यात आले तर ३० जणांवर रनाळे ग्रामिण रुग्णालयात व २५ जणांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, रनाळे येथे मंगळवारी रात्री बाळूमामा यांच्या नावाने भंडारा-महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भगर व आमटी व दूधाचा प्रसाद भाविकांना देण्यात आला. महाप्रसाद घेण्यासाठी गावासह परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर दीड ते दोन वाजेपासून अनेकांना त्रास सुरू झाला. त्यामुळे अनेकांनी रनाळे ग्रामिण रुग्णालयात धाव घेतली. पहाता पहाता दीडशेपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथक रनाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. लागलीच रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. काही जणांना जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री २५ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. रनाळे आरोग्य केंद्रात १०० पेक्षा अधिक जणांवर स्थानिक ठिकाणी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. तर ३० जणांवर रनाळे येथेच उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नरेश पाडवी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारhospitalहॉस्पिटल