नवापूर,दि.16- शहरानजीक लक्झरी-ट्रक अपघातात तीनजण गंभीर तर 12 जण जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. ट्रक चालकास तब्बल तासाभराने केबीन तोडून बाहेर काढण्यात आले.
धुळे-सुरत महामार्गावर शहरापासून तीन किलोमिटर अंतरावर हा अपघात झाला. मुन्ना बालमुकुंद ठाकुर, रा.ग्वाल्हेर, सिताराम शिरीष चोथमल रा.इंदोर व राजेंद्र लक्ष्मण बडगुजर रा.उंदीरखेडे, ता.पारोळा हे जबर जखमी झाले. सुरतकडून येणारी लक्झरी बस (क्रमांक युपी 75-एम 8710) व धुळेकडून येणारी ट्रक (क्रमांक एमएच 04- एच 7460) यांच्यात रायंगण शिवारात पुलाच्या वळणावर समोरासमोर धडक झाली.