शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ प्रमाणपत्र पडताळणी समितीला 15 दिवसांची मुदत

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: November 21, 2017 12:56 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीवर कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली आह़े यामुळे ही याचिका दाखल करणा:या 78 याचिकाकत्र्याच्या प्रकरणांवर केलेली कार्यवाही किंवा आपले म्हणणे मांडण्यासाठी समितीला औरंगाबाद खंडपीठाने 15 दिवसांची मुदत दिली आह़े त्यामुळे येत्या 15 दिवसात ...

ठळक मुद्देमंत्रिमंडळ उपसमितीकडून 1 महिन्यात अभिप्राय
संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीवर कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली आह़े यामुळे ही याचिका दाखल करणा:या 78 याचिकाकत्र्याच्या प्रकरणांवर केलेली कार्यवाही किंवा आपले म्हणणे मांडण्यासाठी समितीला औरंगाबाद खंडपीठाने 15 दिवसांची मुदत दिली आह़े त्यामुळे येत्या 15 दिवसात समिती याबाबत काय कार्यवाही करते याकडे लक्ष लागले आह़ेकाही वर्षापूर्वी टोकरे कोळी यांची 65 व ठाकूर जमातींची 13 असे एकूण 78 प्रकरणे एका संघटनेच्या अध्यक्षामार्फत एकगठ्ठा समितीत दाखल करण्यात आली होती़ परंतु दरम्यानच्या कालावधीत समितीत सहआयुक्त हे पद प्रभारी असल्याने या प्रलंबित प्रकरणांबाबत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप याचिकाकत्र्याकडून करण्यात आला आह़े त्यामुळे न्यायालयाच्या सूचना असूनही समितीने त्यावर कारवाई केली नसल्याने समितीवर कोर्टाचा अवमान केल्याची याचिका आता दाखल करण्यात आली आह़े त्यामुळे ही याचिका दाखल झाल्यावर कोर्टाने या प्रलंबित प्रकरणांचा निकालांबाबत 15 दिवसांच्या आत कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत़ दरम्यान, तत्कालीन प्रभारी सहआयुक्तांच्या कार्यकाळात ही प्रकरणे दाखल झाली होती़ त्यानंतर सहआयुक्तपदी येथे कुणीही आले नसल्याने ही प्रकरणे धुळखात पडली होती़ मंत्रिमंडळ उपसमितीकडे लक्ष.राज्य शासनाकडून आठ सदस्यीय मंत्रिमंडळ समितीचे गठण करण्यात आले आह़े रक्तनाते संबंधातील जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे कुटुंबातील इतर व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याची तरतुद करण्यासाठी जात पडताळणी अधिनियमात बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ त्याच धर्तीवर अनुसूचित जमातीच्या 2003 च्या अधिनिमात सुधारणा करता येईल काय याचा अभिप्राय मागविला आह़ेसमितीने सकारात्मकता दाखत या अधिनियमात सुधारणा होऊ शकते असे अभिप्राय दिल्यास अनुसूचित जमाती समोरील अनेक वर्षाची समस्या सुटणार आह़े ठाकूर व टोकरे कोळी यांची सुमारे 4 हजार प्रलंबित प्रकरणांमधील साडेतिनशे प्रकरणे सहज निकाली लागणे शक्य होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे आता या उपसमितीच्या अभिप्रायावर सर्व अवलंबून असल्याचे म्हटले जात आह़े