शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 14 हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 11:40 IST

नंदुरबार व तळोदा प्रकल्पातील स्थिती : आदिवासी विकास विभागाचा निधी रखडला

नंदुरबार : जिल्ह्यातील 14 हजार आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत़ 2017-18 हे शैक्षणिक वर्ष पूर्ण होऊनही विद्याथ्र्याच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा झालेली नसल्याने विद्याथ्र्याच्या अडचणी वाढल्या आहेत़ शिष्यवृत्ती मिळावी यासाठी विद्याथ्र्यानी प्रकल्प कार्यालयात आंदोलन करूनही प्रश्न सुटलेला नाही़ आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार आणि तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या 111 विविध वरिष्ठ, कनिष्ठ, अध्यापक, फार्मसी, इंजिनियअरींग, डिप्लोमा यासह व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणा:या महाविद्यालयात गेल्या वर्षात 14 हजार विद्याथ्र्यानी प्रवेश घेतला होता़ विद्याथ्र्याच्या प्रवेशानंतर त्यांनी एप्रिल 2018 र्पयतच्या अंतिम मुदतीत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरून दिले होत़े  शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर या विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती मिळण्याची अपेक्षा होती़ परंतू पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊनही त्यांना शिष्यवृत्तीची प्रतिक्षा आह़ेनंदुरबार प्रकल्पांतर्गत 84 महाविद्यालयातून गेल्या शैक्षणिक वर्षात आठ हजार 449 विद्याथ्र्यानी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केला होता़ यातील 7 हजार 169 विद्याथ्र्याचे अर्ज मंजूर करण्यात आले होत़े या विद्याथ्र्याच्या शिष्यवृत्तीपोटी नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने आदिवासी विकास विभागाकडे पाहिल्या टप्प्यात 5 कोटी 57 लाख 280 तर दुस:या टप्प्यात 99 लाख 76 हजार रूपयांचे देयक सादर केले होत़े एकूण 6 कोटी 57 लाख रूपयांची ही रक्कम 84 महाविद्यालयांमध्ये प्रकल्प कार्यालयाने मंजूरी दिलेल्या अभ्यासक्रमाच्या 721 विषयांसाठी मंजूर करण्यात आली होती़ यात विद्याथ्र्याचे प्रवेशशुल्क आणि वार्षिक शिष्यवृत्तीही समाविष्ट होती़ आदिवासी विकास विभागाकडे सादर केलेल्या या देयकाची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नसल्याची माहिती आह़े   महाविद्यालयांना शिष्यवृत्ती मिळालेली नसल्याने विद्याथ्र्याच्या प्रवेश प्रक्रियेसह शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुस:या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासह अडचणी येत असल्याने समस्या वाढल्या आहेत़तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तळोदा, धडगाव आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यातील 34 विविध महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षात प्रवेशित झालेल्या 6 हजार 18 विद्याथ्र्यानी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरून दिले होत़े या विद्याथ्र्याना 2 कोटी 34 लाख 92 हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ याबाबतचे देयक तळोदा प्रकल्पने आदिवासी विकास विभागाकडे पाठवून दिले होत़े 34 महाविद्यालयांमधील 242 विषयांना प्रकल्प कार्यालयाने मंजूरी दिल्यानंतर या शिष्यवृत्तीच्या रकमेला मंजूरी देण्यात आल्याची माहिती आह़े तळोदा प्रकल्प कार्यालयाने दुस:या टप्प्यात 43 लाख रूपयांचे सुधारित देयक विभागाला पाठवले होत़े शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थी सातत्याने प्रकल्प कार्यालयास भेटी देत आहेत़  तळोदा प्रकल्पांतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रवेशित झालेले बहुतांश विद्यार्थी हे सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील गावांसह तळोदा तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत़ महाविद्यालयांमध्ये शिष्यवृत्ती जमा करण्यात आलेली नसल्याने त्यांना नवीन शैैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यास अडचणी आल्या होत्या़