शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हातोडा पाणीपुरवठय़ासाठी 13 कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 12:45 IST

तळोदा पालिका : कचरा संकलनासाठी चार घंटा गाडय़ांचे लोकार्पण

तळोदा : शहरातील हातोडा पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव कामांसाठी पालिकेने पुन्हा शासनाकडे 13 कोटींचा प्रस्ताव पाठविला असून, त्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी कार्यक्रमात दिली. येथील पालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी सहा घंटागाडय़ा खरेदी केल्या आहेत. या गाडय़ांचा लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते.व्यासपीठावर नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, आरोग्य सभापती सुनयना उदासी, महिला व बालकल्याण सभापती अंबिका शेंडे, बांधकाम सभापती भास्कर मराठे, नगरसेवक रामा ठाकरे, सुरेश पाडवी, अमानुद्दीन शेख, हितेंद्र क्षत्रिय, जितेंद्र सूर्यवंशी, हेमलाल मगरे, योगेश पाडवी, अनिता परदेशी, प्रतिक्षा ठाकूर, बेबीबाई पाडवी, अनिताबाई पाडवी, कल्पनाबाई पाडवी, शोभाबाई भोई, योगेश चौधरी, संदीप परदेशी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, योगेश मराठे, राजेंद्र राजपूत उपस्थित होते. या वेळी परदेशी यांनी शहरातील हातोडा पाणीपुरवठा योजनेबाबत माहिती देतांना सांगितले की, या योजनेच्या वाढीव कामांसाठी गेल्या महिन्यातच पालिकेमार्फत साधारण 13 कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठविला आहे. यासाठी संबंधीत विभागाकडे पाठपुरावादेखील सुरू असून, मंजुरीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच हा निधी प्राप्त होणार आहे. यातून तापीनदीवर आधुनिक पद्धतीचा ज्ॉकवेल बसविण्यात येणार आहे. त्यामुळे त्यात गाळही साचणार नाही. याशिवाय शहरातील नवीन वसाहतींबरोबरच सर्व भागातील नवीन जलवाहिन्या टाकण्यात येईल. सध्याच्या जलवाहिन्यांमध्ये प्रचंड क्षार व ब्लिचींग पावडर साचल्यामुळे पाणीपुरवठय़ातही बाधा येत आहे. या योजनेमुळे शहराचा पाणी प्रश्न कायमचा दूर होणार असून, जलशुद्धीकरण प्रकल्पदेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. या वेळी त्यांनी शहरातील स्वच्छताबाबत पालिका ठोस उपाययोजना करीत आहे. मात्र नागरिक, व्यापा:यांनीही कचरा संकलनासाठी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी यांनी केले. कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक विजय सोनवणे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र माळी, गणेश ठाकूर, अभियंता एस.एम. गावीत, मोहन माळी, अश्विन परदेशी आदींसह कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.