शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सीसीटीव्हीअभावी 12 हजार विद्यार्थी असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:30 IST

एक वसतीगृह आणि दोन आश्रमशाळेत कॅमेरे : नंदुरबार प्रकल्पातील आश्रमशाळांची स्थिती

नंदुरबार : धनराट ता़ नवापूर येथील शासकीय आश्रमशाळेत 11 वर्षीय विद्यार्थी कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता़ उपचारादरम्यान या विद्याथ्र्याचा मृत्यू झाल्यानंतर आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले असून नंदुरबार प्रकल्पांतर्गत 12 हजार विद्याथ्र्यासाठी सुरक्षा उपायच नसल्याचे समोर येत आह़े आदिवासी विकास विभागाने गेल्या तीन वर्षापूर्वी आश्रमशाळा आणि वसतीगृहांच्या इमारतीत बायोमेट्रिक व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निश्चित केले होत़े यासाठी पुणे आणि मुंबई येथील कंपन्यांना ठेके देण्यात आले होत़े यातील बायोमेट्रिक लागून नादुरूस्त झाले असले तरी नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत केवळ 2 आश्रमशाळा आणि 1 वसतीगृहात सिसीटीव्ही लावले गेले आह़े सुरु असलेल्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थी टांगणीला आहेत़ नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत नंदुरबार, नवापूर आणि शहादा या तीन तालुक्यात 33 आश्रमशाळा आहेत़ या आश्रमशाळांमध्ये पहिली ते बारावी र्पयतचे 12 हजार 873 विद्यार्थी यंदा शिक्षणासाठी प्रवेशित झाले आहेत़ या विद्याथ्र्याना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी 31 ठिकाणी चांगल्या दर्जाच्या स्वमालकीच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत़ यात केवळ आमसरपाडा ता़ नंदुरबार आणि नवापूर इंग्लिश मेडियम स्कूल, नवापूर या दोन आश्रमशाळा ह्या भाडोत्री इमारतीत सुरू आहेत़ या सर्व इमारतींमध्ये सीसीटीव्ही देण्याचे प्रस्तावित असताना आदिवासी विकास विभागाने केवळ नंदुरबार येथील आंतरराष्ट्रीय शाळा आणि आमसरपाडा आश्रमशाळा या दोनच ठिेकाणी सीसीटीव्ही लावले आहेत़ यातही आमसरपाडा ही इमारत भाडय़ाची आह़े उर्वरित ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची कारवाईच गेल्या तीन वर्षात झालेली नाही़ प्रकल्पांतर्गत असलेल्या 29 वसतीगृहातील स्थितीही दयनीय आह़े याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे असताना केवळ नंदुरबार शहरातील पटेलवाडीत वसतीगृहात कॅमेरे लागले आहेत़ आश्रमशाळा आणि वसतीगृहांच्या बाहेरील स्थितीची वेळोवळी माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही हा सवरेत्तम पर्याय असूनही प्रकल्प कार्यालय आणि आश्रमशाळा यांनी याबाबत पाठपुरावा केलेला नाही़ या घटनेनंतर सीसीटीव्ही लावणार का, याबाबतही योग्य ती माहिती देण्यात आलेली नाही़ सीसीटीव्ही लावणे आणि देखभाल दुरुस्ती हे सर्व नाशिक आयुक्तालयांतर्गत असल्याने नंदुरबार प्रकल्प कार्यालय त्याला गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र सध्या आह़े प्रकल्प कार्यालयांतर्गत नवापूर, शहादा आणि नंदुरबार या शहर आणि तालुक्यांमध्ये 29 वसतिगृहे आहेत़ यात मुलींचे 12, तर मुलांचे 17 वसतिगृह आहेत़ येथे 2 हजार 478 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत़ या विद्याथ्र्याच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याबाबत उदासिनता आह़े केवळ एकाच वसतीगृहात सीसीटीव्ही असून उर्वरित 28 ठिकाणी विद्याथ्र्याची सुरक्षा ही नावाला आह़े धनराट येथील घटना रविवारी सायंकाळी घडल्यानंतर सोमवारी नंदुरबार प्रकल्पच्या अधिकारी व कर्मचा:यांनी आश्रमशाळेत भेट देऊन पाहणी करण्याची अपेक्षा होती़ परंतू अधिकारी मंगळवारी धनराट येथे दाखल झाल्याची माहिती आह़े यावेळी धनराट येथील ग्रामस्थांसोबतच पालकही उपस्थित होत़े ग्रामस्थांनी घटनेबाबत हळहळ व्यक्त केली होती़ आश्रमशाळेत प्रकल्पच्या अधिका:यांनी नेमकी कशाची चौकशी केली, याबाबत महिती मिळालेली नसली तरी रविवारी आश्रमशाळेत उपस्थित कर्मचा:यांची माहिती घेतल्याचे सांगण्यात आले आह़े रविवारी जेवण झाल्यानंतर धनराट आश्रमशाळेचा विद्यार्थी अनिकेत हा मित्रांसोबत शाळेबाहेर पडला होता़ हे विद्यार्थी शौचासाठी बाहेर गेल्याचे आश्रमशाळा प्रशासनाने कळवले आह़े याचदरम्यान त्याच्यावर कुत्र्यांचा हल्ला होऊन तो जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली़दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आश्रमशाळेपासून काही अंतरावर नवापूर एमआयडीसी आह़े येथील कच:यावर फिरणा:या कुत्र्यांचा आश्रमशाळा परिसरालगत संचार होता़ यातीलच काही कुत्रे हे पिसाळल्याने त्यांनी अनिकेतवर हल्ला करत त्याला जखमी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आह़े गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याचे समजूनही संबधित आश्रमशाळा प्रशासनाने विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेत कुत्र्यांचा कोणताही बंदोबस्त केला नाही़   याप्रकरणी नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून प्रकल्पस्तरीय चौकशी करण्यात येणार आह़े यात तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिक्षक यांचा अंतर्भाव असणार आह़े या चौकशीनंतर मयत विद्यार्थी अनिकेत याच्या पालकांना शासकीय मदत मिळण्याची शक्यता आह़े