आष्टे केंद्रातील शिक्षकांनी कलापथकाद्वारे पथनाट्य, स्वरचित गीताने जनजागृती केली होती. तसेच अजेपूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती आदींनी सातत्याने गावात लसीकरणाबाबत जनजागृती केल्याने गावात उर्वरित नऊ नागरिकांचे लसीकरण झाल्याने गावात ४५ वर्षांवरील संर्व नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, आष्टे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन. पाटील, केंद्रप्रमुख दरबार राजपूत व अजेपूरचे सरपंच धर्मा गवळी, उपसरपंच संजीव चौरे, दिलीप गावीत, शत्रुघ्न गवळी, रतिलाल साबळे, मुख्याध्यापक नीलेश धावडे, विशाल पाटील, तलाठी प्रल्हाद पाटील, ग्रामसेवक गायकवाड, पोलीस पाटील अनिल पवार, यशवंत चौरे, अंगणवाडी कर्मचारी ताईबाई चौरे, अनिता गावीत, लक्ष्मी चौरे, लाशीबाई चौरे, राणी गावीत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जाफर तडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील, डॉ. अश्विनी देसले, डॉ. शैलजा कुलकर्णी, आरोग्य सेविका एस.एम. गायकवाड, रेणुका वळवी, आरोग्य सेवक गणेश चांदवडे, सारिका पाडवी, आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र, आष्टे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, ग्रामपंचायत, जि.प. शाळा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच आरोग्य टीमचे सहकार्य लाभले.
अजेपूर येथे १०० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST