शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
3
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
4
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
5
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
6
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
7
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
8
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
9
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
10
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
11
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
12
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
13
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
14
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
15
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
16
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
17
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
18
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
19
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
20
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या

१०० आॅक्सिजन सिलींडर हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने कोविड कक्षातील सोयी सुविधा आता तोकड्या पडू लागल्या आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने कोविड कक्षातील सोयी सुविधा आता तोकड्या पडू लागल्या आहेत़ यात जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात दर दिवशी किमान १०० आॅक्सिजन सिलींडरचा पुरवठा व्हावा यासाठी आता प्रशासन पाठपुरावा करत आहेत़ तूर्तास रुग्णालयात दरदिवशी ५६ ते ६० सिलींडरच पुरवले जात आहेत़जिल्हा रुग्णालयातील नेत्रकक्ष आणि नर्सिंग कॉलेज या दोन ठिकाणी व्हेंटीलेटर लावण्यात आले आहेत़ या व्हेंटीलेटरसाठी आॅक्सिजन, नायट्रस आॅक्साईड, कार्बनडाय आॅक्साईड यांचे सिलींडर वेळोवेळी लागत आहेत़ जिल्हा रुग्णालयात धुळे येथून या सिलींडरचा दरदिवशी पुरवठा करण्यात येतो़ परंतु ही मागणी एकूण १०० सिलींडर दररोज द्यावेत अशी आहे़ त्यातुलनेत होणाऱ्या सिलींडरचा पुरवठा अत्यंत कमी असून हे सिलींडर धुळे येथून येत असल्याची माहिती समोर आली आहे़ आरोग्य विभागाकडून गेल्यावर्षी निविदा काढून कंत्राटदाराला ठेका देण्यात आला आहे़ मिळालेल्या माहितीनुसार हा ठेका अद्यापही सुरू असून ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन सिलींडर लावण्याची कोणतीही व्यवस्था नसताना त्यासाठीही सिलींडरची निविदा गेल्यावर्षी काढण्यात आली होती हे विशेष़ गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना कोविड कक्षात कृत्रिम श्वासोच्छास्वास प्रणालीवर ठेवून त्यांच्या शरीरात कमी झालेली आॅक्सिजन मात्रा वाढीवर भर देण्यात येत असल्याने आॅक्सिजन सिलींडरचा पुरवठा वाढीवर भर देण्याची गरज आहे़ रुग्ण वाढल्यास सध्या असलेले सिलींंडर आणि त्याला जोडलेले बेडही कमी पडून वाढीव सिलींडर आणि बेड निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे़

जिल्हा रुग्णालयात ६६० लीटर क्षमतेचे एक सिलींडर १८० रूपयांना, १ हजार ३२० लीटरचे सिलींडर १९० रुपयांना, जम्बो सिलींडर ३९२ रूपये दराने पुरवले जात आहे़ सोबत १ हजार ८५१ लीटर क्षमतेचे नायट्रोक्स आॅक्साईड सिलींडर ९६३ रुपयांना, ३ हजार ७४४ लीटरचे सिलींडर १ हजार ५०६ रुपयांना, कार्बन डायआॅक्साईडचे ९ किलोचे मोठे सिलींडर ३२४ रूपयाला पुरवण्यात येत आहे़ बाजारभावानुसार हे दर असल्याची माहिती आहे़४सिलींडरच एकीकडे तुटवडा असताना दुसरीकडे बेडची संख्या अत्यंत कमी असल्याचे चित्र आहे़ रुग्णालयाच्या नेत्र कक्षात २५ तर नर्सिंग कॉलेजमध्ये १० अशा ३५ बेडला आॅक्सिजन सिलींडर लावण्याची सोय आहे़ अद्याप रुग्णांची संख्या ही नियंत्रणात असली तरी गंभीर रुग्णांची संख्या मात्र २७ ते ३० च्या जवळपास आहे़ दोन्ही कक्षातील सर्व बेड एकाच वेळी फुल झाल्यास नव्याने येणाऱ्या गंभीर पेशंटचे काय असाही प्रश्न समोर येत आहे़

जिल्हा रुग्णालयात सध्यातरी सिलींडरचा तुटवडा नाही़ धुळे येथून दर दिवशी किमान ६० च्या जवळपास सिलींडरचा पुरवठा केला जातो आहे़ हा पुरवठा अद्याप थांबलेला नाही़ गरज वाटल्यास सिलींडरचा पुरवठा वाढवला जाईल़ पाठपुरावा सुरू आहे़ तत्पूर्वी रुग्ण कोरोनामुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़-डॉ़ के़डी़सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबाऱ