शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

स्वस्तधान्य दुकानावर उडीद डाळही मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:54 IST

अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुदानीत दराने स्वस्तधान्य दुकानावर आता चणा डाळीसह उडीद डाळही मिळणार आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील तहसीलदारांकडून डाळीची मागणी नोंदविण्यात येत आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांकडून मागणीची सुरु झाली नोंदणी

अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुदानीत दराने स्वस्तधान्य दुकानावर आता चणा डाळीसह उडीद डाळही मिळणार आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील तहसीलदारांकडून डाळीची मागणी नोंदविण्यात येत आहे.नाफेडने विहित केलेल्या गोदामामधून चणा व उडीदाची उचल करणे, भरडई करणे, भरडई अंती प्राप्त झालेली डाळ एक किलोच्या पाकिटामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही डाळ रास्तभाव दुकानामार्फत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुदानीत दराने विक्री करायची आहे. याबाबत शासन निर्णय पुरवठा विभागाला कळविण्यात आला आहे.स्वस्तधान्य दुकानावर चणा आणि उडीद डाळ या ३५ रुपये प्रति किलोदराने उपलब्ध होणार आहे. सदर चणा डाळ व उडीदाच्या वितरणापोटी दुकानदारांना प्रतिकिलो दीड रुपयाची मार्जिन मिळणार आहे.शासनाकडून चणा व उडीद डाळीच्या २५ पाकिटाची एक बॅग उपलब्ध करुन दिली जाणार आहे. चणा डाळ व उडीद डाळ विहित ठिकाणी प्राप्त होताना त्या त्या ठिकाणच्या जिल्हा पुरवठा विभागातील प्रतिनिधींची उपस्थिती आवश्यक करण्यात आली आहे.चणा डाळीचे वितरण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातही चणा व उडीद डाळीची नोंदणी पुरवठा विभाग करीत आहे. त्या-त्या तहसीलदारांकडून शिधापत्रिकाच्या संख्येनुसार नोंदणी मागविण्यात येत आहे. नोंदणी प्राप्त झाल्यानंतर शासन डाळी उपलब्ध करुन देणार आहे.दिवाळीसाठी विशेष धान्य कोटा नाहीवर्षातील सर्वात मोठा सण हा दिवाळी मानला जातो. यापूर्वी दिवाळी सणानिमित्त स्वस्तधान्य दुकानावर शिधापत्रिका धारकांनी जादा साखर, इतर धान्य उपलब्ध करुन दिले जात होते. मागील दोन वर्षापासून मात्र दिवाळी अथवा कोणत्याही सणानिमित्त जादा धान्य उपलब्ध करुन दिले जात नाही. आहे त्या धान्याचे नियतनही आता कमी होत चालले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडfoodअन्न