शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

यवतमाळसह मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचे कार्यकर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:53 IST

मामा चौकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठा जनसागर लोटला होता़ नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर यासह यवतमाळ जिल्ह्यातून नागरिक सभास्थळी आले होते़

शिवराज बिचेवार ।नांदेड : मामा चौकातील पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठा जनसागर लोटला होता़ नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर यासह यवतमाळ जिल्ह्यातून नागरिक सभास्थळी आले होते़क्रुझर, जीप, आॅटो, टेम्पो, ट्रकसह मिळेल त्या वाहनाने लोकांचे जथ्थे मोदी यांच्या सभेसाठी आले होते़ नांदेडसह हिंगोली, परभणी, लातूर या चारही जिल्ह्यांतील लोकसभा उमेदवार या सभेला उपस्थित होते़ त्यामुळे त्यांनी आपआपल्या जिल्ह्यातील कार्यकर्ते आणले होते़ दुपारी तीन वाजेपासूनच सभास्थळाकडे नागरिक जात होते़ दुपारपर्यंत नांदेडच्या तापमानाचा पारा अधिक होता़ परंतु, सायंकाळी पाच वाजेनंतर ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला़ सायंकाळी सहा वाजेनंतर मात्र सभास्थळी येणाऱ्यांची संख्या वाढली होती़ यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती़ अनेकांनी सहकुटुंब मोदी यांच्या सभेला हजेरी लावली़ यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी आल्याचे सांगितले़ तर काहींनी त्यांचे भाषण मनाला भावत असल्याचे म्हटले़ यावेळी चिमुकल्यांसह तरुणांनी मोदी यांचा मुखवटा घातला होता़ सभेला तरुणांची गर्दीही लक्षणीय होती़ तरुणाईने सरकारच्या रोखठोक निर्णयांचे स्वागत केले़ सभा आटोपल्यानंतर मात्र वाहनांची एकच गर्दी झाली.वेट अ‍ॅण्ड वॉचजागेसाठी तीन तास आधी आलो...सायंकाळी सहा वाजता सभा सुरु होणार होती़ परंतु सभास्थानी समोर जागा जागा मिळावी म्हणून नागरिकांनी दुपारी तीन वाजेपासूनच मैदानात येण्यास सुरुवात केली होती़ यावेळी नागरिकांनी व्यासपीठ व मैदानावर सेल्फी घेतले़ तर काही जण गटातटाने बसून निवडणूक कशी रंगतदार झाली याबाबत चर्चा करीत होते़ तर कुणी सभांमुळे पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण, यासाठी केला जाणारा खर्च किती अवाढव्य असेल, याचाही अंदाज बांधत होते़सभेसाठी आलेल्या महिला म्हणतात...महागाई कमी करणारे सरकार यावे...मोदी यांच्या सभेत महिलांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती़ या सभेला महिलांसह महाविद्यालयीन तरुणीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़ यावेळी सुरेखा पवार या महिलेने देशात महागाई कमी करणारे सरकार येणे गरजेचे आहे़ सरकारने महिलांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे म्हटले़ तर सुप्रिया पाटील ही विद्यार्थिनी म्हणाली, सरकारने विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे़ आज ग्रामीण भागात पैसे नसल्यामुळे अनेक मुली आत्महत्या करीत असल्याचेही तिने नमूद केले़असे होते सभेचे नियोजनदहा ठिकाणी पार्कींगची व्यवस्थासभेसाठी मोठ्या संख्येने वाहनांनी कार्यकर्ते येणार हे लक्षात घेत पोलिसांनी सभास्थळाच्या समोरच्या बाजूने दहा पार्किंग स्थळे निश्चित केली होती़ समोरील मोकळ्या प्लाटची त्यासाठी स्वच्छता करण्यात आली होती़ त्याचबरोबर सभास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी अनेक रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली़ योग्य नियोजनामुळे कुठेही वाहतुकीची कोंडी झाली नाही़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी