शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीतील वनस्पती काढण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 19:59 IST

गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कंद वनस्पती काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. गोदावरी जीवरक्षक दलाच्या सहायाने ही वनस्पती काढली जात आहे. 

ठळक मुद्देगोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसांपासून वनस्पती वाढत असल्याचे दिसून आले. १२ घाटांवर वाढत असलेली ही वनस्पती काढण्याचे काम सुरू आहे.

नांदेड : गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कंद वनस्पती काढण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. गोदावरी जीवरक्षक दलाच्या सहायाने ही वनस्पती काढली जात आहे. 

गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसांपासून वनस्पती वाढत असल्याचे दिसून आले. ही वनस्पती कंद वनस्पती असल्याचे पुढे निष्पन्न झाले. या वनस्पतीचे प्रमाण वाढतच होते. ते काढण्याचे काम महापालिकेने  महाराष्ट्र दिनापासून सुरू केले आहे. शहरातील नावघाट, नगिनाघाट, गोवर्धनघाट, बंदाघाट, काळेश्वर घाट, तारातीर्थ घाट आदी १२ घाटांवर वाढत असलेली ही वनस्पती काढण्याचे काम सुरू आहे.गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा विषय पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गांभीर्याने घेतला आहे.

गोदावरी नदीचे शुद्धीकरण झालेच पाहिजे, ही भूमिका घेत शहरातील सांडपाणी गोदावरीत कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. या आदेशानुसार शहरातील सांडपाणी पंपिंग स्टेशनवर नेले जात आहे. आता त्यातच कंद वनस्पतीचे संकट पुढे आले. मोठ्या झपाट्याने ही वनस्पती वाढत आहे. परिणामी गोदावरीच्या प्रदूषणात वाढच होत आहे. त्यामुळे महापालिकेपुढील चिंतेत वाढच होत होती. 

महापालिकेने शहरातील गोदावरी जीवरक्षक दलाला कंद वनस्पती काढण्याचे काम सोपविले आहे. हे काम मागील चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. आगामी दहा-बारा दिवसांत बारा घाटांवर वाढत असलेली कंद वनस्पती काढण्याचे काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :godavariगोदावरीNandedनांदेडwater pollutionजल प्रदूषणriverनदी