शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील लहान गावच्या महिलांनी जिंकली दारुबंदीची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:06 IST

नामदेव बिचेवार। लोकमत न्यूज नेटवर्क लहान: येथील ४० वर्षांपासून सुरू असलेले देशी दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी १३ डिसेंबर ...

ठळक मुद्देलहानमध्ये बाटली आडवी: १२६९ पैकी १११५ महिलांनी दारु दुकानाला केला विरोध

नामदेव बिचेवार।लोकमत न्यूज नेटवर्कलहान: येथील ४० वर्षांपासून सुरू असलेले देशी दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी १३ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली़ मतदानाला महिलांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाल्याने हा लढा यशस्वी ठरला़ एकूण २ हजार ३२ मतदानांपैकी १ हजार २६९ मतदान झाले़ पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान झाल्याने लहानमध्ये बाटली आडवी पडली़ या निवडणुकीत महिलांनी १ हजार ११५ मतांनी हा ऐतिहासिक विजय मिळविला़मागील सहा महिन्यांपासून दारूबंदीसाठी महिलांनी कायदेशीर लढा उभारला होता़ गावकºयांनीही याबाबत पाठपुरावा केला होता़ अखेर दारूबंदीच्या या लढाईत महिला व ग्रामस्थ यशस्वी झाले़ लहान येथील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महसूल विभागाकडून मतदान घेण्याची प्रक्रिया करण्यात आली़ यासाठी १३ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले़ गावातील महिलांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती़ गावातील देशी दारू दुकान बंद होणार व व्यसनापासून गावास मुक्ती मिळणार या कल्पनेने महिलांमध्ये आनंद दिसत होता़ तसेच नितीन इंगळे यानेही दारुबंदीसाठी पुढाकार घेतला होता़सकाळी आठ वाजल्यापासूनच आडव्या बाटलीसाठी मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू झाली़ गावातील तीन वॉर्डातील मतदान पुढीलप्रमाणे, प्रभाग एक - एकूण महिला मतदान ६४२, झालेले मतदान ४४६, प्रभाग दोन - एकूण मतदान ६९५, झालेले मतदान ३९६, प्रभाग तीन - एकूण मतदान ६९७, झालेले मतदान ४२७़ एकूण १ हजार २६९ महिला मतदारांनी मतदानाचे कर्तव्य बजावले़ महिलांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला़४ या विजयास महिलांचे प्रयत्न सार्थक ठरले़ आडव्या बाटलीचा लढा यशस्वी ठरला आहे़ - शोभाबाई रणखांब, सरपंच़४दारूबंदीच्या लढ्यासाठी गावकºयांनी व रणरागिनीने प्रचारात आघाडी घेतली होती़ महिला बचत गट, महिला मंडळ, अंगणवाडी सेविका, गावकरी मंडळी व युवकांच्या सहकार्याने हा विजय मिळविला़ - सतीश देशमुख लहानकर, उपसरपंच़जिल्हाधिकाºयांना सादर करणार अहवाल४२ हजार ३२ मतदानांपैकी १ हजार २६९ मतदान झाले़ उभी बाटली ९५, आडवी बाटली १११५ व बाद मतदान ५९ झाले़ मतदान ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यासंदर्भात अहवाल जिल्हाधिकाºयांना देण्यात येईल़ त्यानंतर बंदची कार्यवाही होईल़ - राजेश लांडगे, निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार, अर्धापूऱ