शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या आरोपातून महिलेला बांधून मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:10 IST

अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चार महिलांनी ग्रामस्थांसमोर दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़

नांदेड : अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चार महिलांनी ग्रामस्थांसमोर दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़ या मारहाणीचा व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात चार महिलांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 

मनीषा (नाव बदलले) ही महिला पती व दोन मुलांसोबत आसोली येथे राहते़ तिचे गावातील एकाशी गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याच्या आरोपातून मार्च महिन्यात गावातील प्रतिष्ठीत मंडळींनी बैठक घेवून तिला व तिच्या प्रियकराला बोलविले होते़ यावेळी हे नाते पुढे न ठेवण्याचे सर्वांसमक्ष ठरविण्यात आले़ तिला प्रियकराकडून तिला २ लाख २० रुपये देण्यात आले़ प्रकरण मिटल्यानंतर ती माहेरी गेली होती़  त्यानंतरही तिचा प्रियकर वारंवार फोन करीत होता़ ९ एप्रिल रोजी दुपारी १२च्या सुमारास ती आॅटो करुन आसोली येथे प्रियकराच्या घरी गेली़ यावेळी संतप्त झालेल्या प्रियकराच्या पत्नीने इतर तीन महिलांच्या मदतीने तिला शिवीगाळ केली़ त्यानंतर हात आणि पाय दोरीने बांधून घरासमोरच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली़ तसेच डोळ्यात मिरची पूडही टाकली़ हा सर्व प्रकार ग्रामस्थांच्या समोरच सुरु  होता़ त्यानंतर सरपंच व इतर मंडळींनी मध्यस्थी करुन तिची सोडवणूक केली़

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तिला वाई येथील रुग्णालयात दाखल केले़ तिच्या जवाबावरुन तीन दिवसांपूर्वीच मारहाण करणा-या ललिताबाई चव्हाण, सुमित्राबाई चव्हाण, रुक्माबाई राठोड व शांतीबाई चव्हाण या महिलांच्या विरोधात सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली़ 

...तर आत्महत्या करण्याचा इशारापोलिसांच्या कारवाईमुळे समाधान न झालेल्या मनीषाने बुधवारी नांदेड गाठले़ पोलीस अधीक्षकांची भेट घेवून आपली कैफीयत मांडली़ मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला. दुसरीकडे या मारहाणीचा व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.  बलात्काराचा गुन्हा दाखल

महिलेशी अनैतिक संबंधाचा आरोप असलेल्या फुलसिंग चव्हाण याच्या विरोधात सिंदखेड ठाण्यात गुरुवारी रात्री बलात्काराचा गुन्हा नोंदवला. आरोपीला तपासणीसाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. महिलेने चटणी अंगावर टाकल्यामुळे आणखी तीन मुलींची नावे घेतली होती. त्या अल्पवयीन असल्यामुळे चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. 

टॅग्स :Crimeगुन्हाWomenमहिलाNanded policeनांदेड पोलीसArrestअटकRapeबलात्कार