शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड-जालना समृद्धी महामार्गाच्या मावेजावर निघणार तोडगा? मंत्रालयात होणार बैठक

By शिवराज बिचेवार | Updated: August 25, 2023 18:47 IST

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाला मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्हा जोडण्यासाठी नांदेड ते जालना या मार्गासाठी शासनाने भूसंपादनास सुरुवात केली आहे.

नांदेड-समृद्धी महामार्गाला जोडणार नांदेड-जालना या रस्त्यासाठी नांदेडसह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हजारो शेतकर्यांच्या शेत जमीनी जाणार आहेत. या भूसंपादनाचा मावेजा शासन नियमानुसार मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु बाधित शेतकर्यांनी या जमिनी सुपिक असून बाजारभावाच्या पाचपट मावेजा देण्याच्या मागणीसाठी शेतकरी अडून बसले आहेत. त्यामुळे मोठी गोची झाली आहे. आता यावर तोडगा काढण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समृद्धीच्या मावेजावर तोडगा निघतो का? याकडे तीन जिल्ह्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाला मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्हा जोडण्यासाठी नांदेड ते जालना या मार्गासाठी शासनाने भूसंपादनास सुरुवात केली आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील १४ गावातील दीड हजार शेतकर्यांच्या जमिनी जाणार आहेत. त्यापैकी ७ गावांचे मुल्यांकन झाले आहे. तर उर्वरित गावांच्या मुल्यांकनाला जिल्हाधिकार्यांची मंजूरी बाकी आहे. अशाचप्रकारे हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांच्या जमिनी या मार्गासाठी घेण्यात येणार आहेत. परंतु प्रत्यक्षात या जमिनीचे कागदावर झालेले व्यवहार आणि सध्या असलेला बाजारभाव यामध्ये तफावत आहे. त्यामुळे शासनाकडून नियमानुसार मावेजा मिळणार असल्याची भूमिका घेण्यात आली. तर शेतकरी मात्र बाजारभावाच्या पाच पट मावेजाची मागणी करीत आहेत. या विषयावर यापूर्वीही बैठका घेण्यात आल्या. परंतु त्यातून तोडगा निघाला नाही. त्यामुळे या महामार्गाच्या कामाला म्हणावी तशी गती मिळाली नाही. आता पुन्हा एकदा येत्या ३० ऑगस्टला मंत्रालयात दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला तिनही जिल्ह्यातील लोकप्रतिनधीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत मावेजावर तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बैठकीचे या लोकप्रतिनिधींना निमंत्रण३० ऑगस्ट रोजी मंत्रालयात होत असलेल्या बैठकीचे खा.संजय जाधव, आ.बालाजी कल्याणकर, आ.बबनराव लोणीकर, आ.डॉ.राहूल पाटील, आ.सुरेश वरपूडकर, आ.अर्जून खोतकर, आ.मेघना बोर्डीकर, आ.रत्नाकर गुट्टे, आ.मोहन हंबर्डे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सह.व्यवस्थापकीय संचालक, नांदेड, हिंगोली, परभणीचे जिल्हाधिकारी, मुख्य महाव्यवस्थापक हे उपस्थित राहतील.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNandedनांदेडJalanaजालना