शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:15 IST

पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील महाजनपेठ येथे घडली. लक्ष्मीकांत माधवराव नारलावार (वय ४०) असे मयताचे नाव आहे.

ठळक मुद्देमुखेड शहरातील घटना : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील महाजनपेठ येथे घडली. लक्ष्मीकांत माधवराव नारलावार (वय ४०) असे मयताचे नाव आहे.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान पेपर आणण्यासाठी म्हणून लक्ष्मीकांत हे घराबाहेर पडले, मात्र दुपारी १ वाजेच्या दरम्यान लक्ष्मीकांत यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा निरोप मोंढ्यातील एका कृषी दुकानदाराने दिला. दरम्यान, उपचारासाठी लक्ष्मीकांत यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयताच्या खिशात चिठ्ठी सापडली. पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद करुन या प्रकरणाला लक्ष्मण अंबादास पेडगूलवार, पत्नी, राम अंबादास पेडगूलवार, दत्तात्रय अंबादास पेडगूलवार, अनिता राम पेडगूलवार, दैवशाला पेडगूलवार जबाबदार असल्याचा आरोप केला. पोलिसांनी यातील पत्नीस अटक केली. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. इतर आरोपी फरार झाले. पोनि संजय चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ओमकार गिरी तपास करीत आहेत.नातेवाईकांनी आरोपीला घातले पाठीशी४मयताचा भाऊ श्रीनिवास नारलावार यांनी मुखेड पोलिसांत फिर्याद दिली. आरोपी लक्ष्मण अंबादास पेडगूलवारसोबत माझ्या भावजयीचे मागील दीड वर्षांपासून अनैतिक संबंध असून, यासंदर्भात आरोपी व त्याच्या नातेवाईकांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्हालाच धमकावण्यात आले. दोघे राजी असतील तर आम्ही काय करावे? असे म्हणत नातेवाईकांनी आरोपीची पाठराखण केली. १५ फेब्रुवारी रोजी भाऊ लक्ष्मीकांत याने आरोपीच्या घरी जावून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी भावालाच धमकावण्यात आले. एकूणच हा प्रकार लक्ष्मीकांत यांना सहन झाला नाही.