शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्याकडे काय बघतोस', म्हणून चाकूचे वार; कुख्यात आरोपीकडून भर दिवसा एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 15:33 IST

माझ्याकडे काय पाहतोस, अशी विचारणा करीत आरोपीने वाद घातला

ठळक मुद्देआरोपीने महंमद सरवरला भर चौकात भोसकले़आरोपीवर वजिराबाद पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत

नांदेड : नयुमखान अयुबखान ऊर्फ मड्डीदादा याने माझ्याकडे काय बघत आहेस, असे म्हणून  महंमद सरवर (४0) या  व्यक्तीचा भरदिवसा चाकूने भोसकून खून केला. ही घटना गुरुवारी नांदेड शहरातील खडकपुरा भागात दुपारी चारच्या सुमारास घडली़ या घटनेनंतर मारेकऱ्यास वजिराबाद पोलिसांनी अटक केली. 

शहरातील खडकपुरा येथील महंमद सरवर महंमद कैसर हा गुरूवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत चौकात बोलत थांबला होता़ त्यावेळी तेथून नयुमखान अयुबखान ऊर्फ मड्डीदादा हा तेथून आपल्या घरी जात होता़ दरम्यान, महंमद सरवर यांनी नयुमखानकडे पाहिले़ त्यावेळी माझ्याकडे काय पाहतोस, अशी विचारणा करीत नयुमखानने वाद घातला. या वादानंतर नयुमखानने आपल्या घरातून चाकू आणून महंमद सरवरला भर चौकात भोसकले़ घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ घटनास्थळावरून नयुमखानला पोलिसांनी अटक केली़ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़ नयुमखान याच्यावर वजिराबाद पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ 

...तरीही आरोपी वार करीतच राहिला चाकूचे वार करताना नागरिकांनी का मारत आहेस, अशी विचारणा केली़ मात्र, नयुमखानची या भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला अडवण्याचे कुणीही धाडस केले नाही़ तो वार करीतच राहिला़ जखमी अवस्थेतील महंमद सरवरने स्वत:ला वाचविण्यासाठी टाहो फोडला़ नागरिकांनी महंमद सरवरला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेत असतानाच तो मरण पावला़ या घटनेनंतर नयुमखान तिथेच थांबला़ 

टॅग्स :MurderखूनNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी