शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र दाभोलकर- गोविंद पानसरे हत्येच्या तपासाचे काय ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:50 IST

दाभोळकरांच्या सात तर पानसरेंच्या हत्येला पाच वर्षे उलटूनही प्रगती नाही

ठळक मुद्देसुशांतसिंह मृत्यू; तपासाला आता किती वर्षे घेणार?

नांदेड : सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयकडे सोपविण्यात आला, हे चांगलेच आहे. परंतू समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंदराव पानसरे यांचे हत्या प्रकरण सीबीआय सात वषार्पासून हाताळत आहे. या दोन्ही प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले, तपासाचे पुढे काय झाले, असा संतप्त सवाल विधान परिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांनी उपस्थित केला आहे.

बुद्धीवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अनिष्ठ रुढी, परंपराविरोधात आयुष्यभर लढा दिला. समाजातील अनेक भोंदू बाबांचे त्यांनी पितळ उघडे पाडले. अशा  समाजसुधारकाची एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित झालेल्या माथेफिरूंनी २० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यात गोळ्या झाडून हत्या केली. दाभोळकर यांच्या हत्येनंतर दिडच वर्षात महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांचीही याच विचारधारेच्या व्यक्तींकडून कोल्हापुरात १६ फेब्रुवारी २०१५  रोजी सकाळी गोळीबार करून हत्या करण्यात आली. या दोघांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या असंतोषाचे परिणाम राजकारणावरही झाले.  

सीबीआयने दाभोलकर-पानसरे या दोन्ही हत्या प्रकरणांचा तपास स्वत:कडे घेतला. आता यातील पहिल्या घटनेला सात वर्षे तर दुसऱ्या घटनेला पाच वर्षे झाली असून सीबीआय तपासात काहीही प्रगती झालेली नाही. ही दोन्ही प्रकरणे हातावर असतांना आता  सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपविण्यात आल्याचे सांगत, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला, हे चांगलेच झाले. पण अगोदरच सीबीआयकडे सोपविलेल्या दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाचे काय? याचा तपास अद्यापही गुलदस्त्यातमध्ये का आहे? असा संतप्त सवाल विधान परिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांनी उपस्थित केला आहे. आधी दाभोलकर-पानसरेंच्या मारेकऱ्यांना शोधून काढा, मगच सुशांतसिंह आत्महत्येचे प्रकरण हाताळा, अशी मागणीही आ. राजूरकर यांनी केली आहे.

सुशांतसिंह मृत्यू; तपासाला आता किती वर्षे घेणार?सुशांतसिंहच्या तपासाला आता अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येला आता दोन महिने झाले. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयकडे वर्ग करण्यास मंजूरी दिली. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करायला आणखी किती वर्षे लावील याचा नेम नाही. अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येला आता दोन महिने झाले. या काळात राजकारण चांगलेच शिगेला गेले़ त्यातच सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्यास मंजूरी दिली. आता या तपासाला सीबीआय किती वर्षे घेणार असा सवालही राजूरकर यांनी केला. 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरGovind Pansareगोविंद पानसरेNandedनांदेड