शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:32 IST

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली़ परंतु, तत्त्वत: अन् ओटीएसच्या ...

ठळक मुद्देनियमांचा कचाटा : जिल्ह्यात ७८७ कोटींची माफी

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली़ परंतु, तत्त्वत: अन् ओटीएसच्या कचाट्यात आजही लाखो शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही़ एकट्या नांदेड जिल्ह्यात ३१ हजार १०५ शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे़उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर तेथील मुख्यमंत्री योगी यांनी शेतकºयांना कर्जमाफी दिली. उत्तर प्रदेशात कर्जमाफी करता येते; मग महाराष्ट्रात का नाही, या मुद्यावर विरोधकांसह विविध शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याने शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला़ नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकºयांना सदर कर्जमाफीचा फायदा होईल, असे बोलले जात होते़ परंतु, १ लाख ७६ हजार ५० शेतकरीच कर्जमाफीस पात्र ठरले़ त्यातही आजपर्यंत प्रत्यक्ष १ लाख ४४ हजार ९४५ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे़ या सर्व शेतकºयांच्या बँक खात्यात ७८७ कोटी ९८ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत़नांदेड जिल्ह्यातील शेतकºयांवर खासगी आणि सरकारी बँकांचे मिळून एकूण १ हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज होते़ त्यापैकी ७८७ कोटी रूपये आजपर्यंत बँकांच्या खात्यात वर्ग झाले आहेत़ नांदेड जिल्ह्यासाठी १ हजार २३ कोटी ८९ लाख रूपये मिळाले होते़ त्यापैकी २३५ कोटी रूपये आजही बँकांच्या खात्यात पडून आहेत़राज्य सरकारने शेतकºयांना दिलेल्या कर्जमाफीत दीड लाख रूपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ केले़ तर दीड लाखाहून अधिक कर्ज असणाºया शेतकºयांसाठी एकरकमी परतफेड योजना लागू केली होती़ परंतु, या योजनेकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे़ त्यामुळेच ३१ हजार १०५ शेतकरी पात्र असूनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जावू शकत नाही़ एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घेऊन त्यांनी दीड लाखांवरील रक्कम भरल्यास २३५ कोटी ९६ लाख रूपयांचा लाभ मिळू शकेल़

  • नांदेड जिल्ह्यात स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेकडून सर्वाधिक ७६ हजार ८८० शेतक-यांना ५३० कोटी ७७ लाख रूपये कर्जमाफी देण्यात आली आहे़ तर बँक आॅफ महाराष्ट्रामधून ६ हजार ५१४ शेतक-यांना ३० कोटी ७६ लाख रूपये, डीसीसीबी बँकेतून ३९ हजार ४०७ शेतकºयांना ५३ कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली़

खावटी कर्ज माफ करण्याचा सरकारचा निर्णयछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य सरकारने घेतला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील हजारो शेतकºयांना लाभ मिळणार आहे़ सरकारकडून कर्जमाफी संदर्भात वारंवार वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत़ त्यामुळे येणाºया काळात सरसकट कर्जमाफी केली जाईल, या आशेने दीड लाखावरील कर्ज भरण्यास कोणीही शेतकरी धजावत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी