शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

थांब बेटा, परत जा..! जीवन संपविण्यासाठी आलेल्यांना गोदामाईची हाक, पुलावर लागले पत्र

By शिवराज बिचेवार | Updated: April 2, 2024 15:12 IST

याच पुलावरुन जीवनयात्रा संपविलेल्या मुलाच्या पालकाने आवाहन करत डकविले पत्र

नांदेड : शहरातील गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आजपर्यंत अनेकांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामुळे गोदावरीचा पूल डेथ पॉईंट म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे. यवतमाळ येथील एका मुलाने याच ठिकाणाहून आत्महत्या केल्यानंतर त्या दु:खातून सावरत पालकांनी चक्क गोदावरीच्या पुलावरच गोदामाईचे भावनिक पत्र ठिकठिकाणी लावले आहे. ‘थांब बेटा.. परत जा..!’ असे लिहिलेले एक दीर्घ पत्रक सध्या गोदावरी नदीच्या पुलावर जागोजागी दिसून येत आहेत. त्या पत्रकातून खुद्द गोदामाईच जीवनाचे महत्त्व समजावून सांगत आहे.

गोदावरी नदी ही जीवनवाहिनी आहे. परंतु आजवर अनेकांनी किरकोळ कारणावरूनही नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. महिन्याकाठी हे प्रमाण तीन ते चार एवढे आहे. मध्यंतरी पुलावर जाळी लावण्याचा विचारही त्यातून पुढे आला होता. परंतु नंतर ताे बारगळला. परंतु यवतमाळ येथील एका पालकाने गोदावरी नदीच्या पुलावर गोदामाईचे पत्रच लावले आहे. एखादी व्यक्ती आयुष्याला कंटाळून पवित्र गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी घेण्यासाठी आल्यास त्याला परावृत्त करण्यासाठी हा प्रयत्न केलेला दिसून येतो. हे भावनिक पत्र अनेकांना खुणावत आहे. गोदावरीच्या पुलावर होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशाही भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त केल्या जात आहे.

अकाली जीवनयात्रा संपविण्यासाठी येथे येणाऱ्या नाराज व्यक्तींना धीर देण्यासाठी कुण्यातरी संवेदनशील व्यक्तीने हे पत्रक गोदावरीच्या पुलावर जागोजागी लावले आहे. या पत्रकातून स्वत: गोदावरी नदीच जीवन वाचविण्याचा संदेश देत आहे... ‘थांब बेटा... परत जा...!’ अशी आर्त हाक देऊन त्यांना जीवनयात्रा न संपवण्याची विनवणी या पत्रकातून खुद्द गोदावरीमाईने केली आहे.

टॅग्स :godavariगोदावरीNandedनांदेड