शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:25 IST

नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणुकीची मतदार यादी तयार करणे व प्रसिद्धीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.

ठळक मुद्देनाव नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणुकीची मतदार यादी तयार करणे व प्रसिद्धीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. यासाठी मतदार नोंदणीचे अर्ज संबंधित तहसील कार्यालयात २० जुलै ते १८ आॅगस्ट या कालावधीत उपलब्ध राहणार असून १ जुलै २०१८ रोजी विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदार यादीत ज्यांची नावे आहेत व जे सामान्यत: जुन्या हैदराबाद संस्थांचा भाग महाराष्ट्र राज्यात समाविष्ट केलेल्या भागात राहतात अशा सर्व शिख मतदारांना या मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे.नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब मंडळाची निवडणूक घेण्याचे शासनाने ठरविले असून अबचलनगर साहिब मंडळाच्या अधिनियम १९५६ च्या कलम ६ पोटकलम २ अन्वये बोर्डाची तीन सदस्य निवडणूक घेण्यासाठी ही मतदार यादी तयार करण्यात येणार आहे.साधाणत: औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, बीड, लातूर हे जिल्हे व चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील या भागातील शिख मतदारांना या मतदार यादीत नाव नोंदविता येईल.पात्र मतदारांनी २० जुलै २०१८ या तारखेपासून ३० दिवसात त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवायचे आहे. प्रारूप मतदार यादी तयार झाल्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर व गुरुद्वारा बोर्डाच्या कार्यालयात ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर नियम ९ व १० प्रमाणे कार्यवाही होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले आहे.---असा आहे मतदारयादी नोंदणी कार्यक्रम१ जुलै २०१८ रोजी महाराष्ट्र विधानसभा मतदार यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी २० जुलै ते १८ आॅगस्ट या ३० दिवसात संबंधित तहसील कार्यालयात फॉर्म १ भरुन द्यावा लागणार आहे. त्यानंतर १९ आॅगस्ट ते २५ आॅगस्ट या कालावधीत सक्षम अधिकारी, जिल्हाधिकारी प्रारुप मतदार यादी तयार करणार आहेत. ही यादी २७ आॅगस्ट २०१८ रोजी प्रसिद्ध होणार आहे. २८ आॅगस्ट ते २६ सप्टेंबर या कालावधीत सक्षम अधिकारी तहसीलदार फॉर्म २ नुसार दावे व हरकती स्वीकारतील. २७ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर सक्षम अधिकारी, जिल्हाधिकारी दावे व हरकती निकाली काढतील. ५ आॅस्टोबर ते १९ आॅक्टोबर या कालावधीत सक्षम अधिकारी विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्णयाविरुद्ध अपिल करता येईल. २० ते २६ आॅक्टोबर विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेली अपिल प्रकरणे निकाली काढण्यात येतील.३ नोव्हेंबर २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

टॅग्स :NandedनांदेडGurudwara Railway station Roadगुरुद्वारा रेल्वे स्टेशन रोडElectionनिवडणूक