शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरी पुन्हा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:12 IST

महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेचा फटका शुक्रवारी विष्णूपुरी प्रकल्पाला बसला़ चार वर्षानंतर काही महिन्यांपूर्वीच विष्णूपुरी प्र्रकल्पाचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता़ परंतु प्रकल्पाच्या थकबाकीचे शुक्लकाष्ठ अजून संपले नसून महावितरणने १३ कोटी २४ लाखांच्या थकबाकीपोटी प्रकल्पाचा वीजपुरवठा तोडला़ त्यामुळे पुन्हा एक प्रकल्प अंधारात गेला आहे़

ठळक मुद्दे१३ कोटी २४ लाख थकबाकीपोटी तोडला वीजपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेचा फटका शुक्रवारी विष्णूपुरी प्रकल्पाला बसला़ चार वर्षानंतर काही महिन्यांपूर्वीच विष्णूपुरी प्र्रकल्पाचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता़ परंतु प्रकल्पाच्या थकबाकीचे शुक्लकाष्ठ अजून संपले नसून महावितरणने १३ कोटी २४ लाखांच्या थकबाकीपोटी प्रकल्पाचा वीजपुरवठा तोडला़ त्यामुळे पुन्हा एक प्रकल्प अंधारात गेला आहे़विष्णूपुरी प्रकल्पावर गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास ४० कोटींपेक्षा अधिकची थकबाकी होती़ त्यामुळे महावितरणने प्रकल्पाचा वीजपुरवठा तोडला होता़ त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून प्रकल्प अंधारातच होता़ पावसाळ्याच्या काळात प्रकल्पाचे दरवाजे उचलण्यासाठी या ठिकाणी दोन जनित्राची सोय करण्यात आली होती़ प्रकल्प भरल्यानंतर जनित्राच्या माध्यमातूनच दरवाजे उघडून पाणी सोडण्यात येत होते़ विजेवर किंवा जनित्राद्वारे दरवाजे उचलण्यासाठी सारखाच म्हणजे ४५ मिनिटांचा वेळ लागत होता़त्यामुळे पाटबंधारे विभागानेही प्रकल्पाची थकबाकी देवून वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत कुठल्याही हालचाली केल्या नव्हत्या़ मागील वर्षी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडच्या दौºयावर आले होते़ यावेळी आ़ हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून थकबाकीतून थोडा दिलासा मिळाला होता़ त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच प्रकल्पाचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता़ त्यात आता महावितरणने शून्य थकबाकीची मोहीम सुरु केली आहे़ या मोहिमेचा फटका प्रकल्पाला बसला आहे़ प्रकल्पाकडे आजघडीला असलेल्या १३ कोटी २४ लाखांच्या थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा तोडला आहे़ त्यामुळे प्रकल्प पुन्हा अंधारात गेला आहे़ त्यामुळे लोकप्रतिनिधींना थकबाकीसाठी पुन्हा राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे़ मात्र या ठिकाणी रात्रपाळीला कार्यरत असलेल्या पाटबंधारे व पोलीस कर्मचाºयांची त्यामुळे मोठी गैरसोय होणार आहे़विष्णूपुरी प्रकल्पाकडे असलेल्या थकबाकीसंदर्भात यापूर्वीही अनेकवेळा महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता़ त्यामुळे पाटबंधारे विभागाने दरवाजे उचलण्यासाठी या ठिकाणी जनित्र आणून ठेवले