शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वेणीकरांच्या जामिनावर ३ जुलै रोजी होणार सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 01:00 IST

कोट्यवधी रुपयांच्या कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी आणि तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी बिलोली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे़ या अर्जावर शनिवारी युिक्तवाद करण्यात आला.

ठळक मुद्देधान्य घोटाळा सीआयडीच्या अहवालावरही आक्षेप

नांदेड : कोट्यवधी रुपयांच्या कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी आणि तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी बिलोली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे़ या अर्जावर शनिवारी युिक्तवाद करण्यात आला. आता ३ जुलै रोजी युक्तिवादानंतर यावर निर्णय अपेक्षित आहे़कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणात मुख्य आरोपी अजय बाहेती, कंत्राटदार पारसेवार यांच्यासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे़ सध्या हे आरोपी हर्सूल कारागृहात आहेत़ या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी पथकासमोर या घोटाळ्याची सर्व साखळी शोधण्याचे आव्हान आहे़ त्यातच तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी बिलोली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ या अर्जावर शनिवारी युक्तिवाद करण्यात आला़वेणीकर यांच्या वकिलांनी जामीन देण्यात यावा या विषयावर युक्तिवाद केला़ त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर ३ जुलैला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले़ ३ जुलै रोजी वेणीकर यांच्या जामिनाला आक्षेप नोंदविणाºया मोहम्मद रफिक यांचे वकील अ‍ॅड़ इद्रीस कादरी यांनाही न्यायालय युक्तिवाद करण्याची संधी देवू शकते़ त्यानंतर वेणीकर यांच्या जामिनाबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे़दरम्यान, न्यायालयाने मोहम्मद रफीक यांना या प्रकरणात पक्षकार बनविण्याची विनंती मान्य केली आहे़ तसेच रफीक यांनी वेणीकर यांच्याबाबतीत सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या से रिपोर्टला आक्षेप घेतला आहे़ दिवसेंदिवस या प्रकरणाचा गुंता वाढत चालला असून आता ३ जुलैला जामीन अर्जावर होणाºया सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़उच्च न्यायालयातही सुनावणीयाचिकाकर्ते महमद अरीफ यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. ५ जुलै रोजी या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये तपासीक अधिकारी नेमकी काय बाजू मांडतात, यावरुन पुरवणी शपथपत्र किंवा आमची बाजू मांडण्यासाठी वेळ देण्याची विनंती करण्यात येणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालय