शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पावत्यांवर वेगवेगळ्या नोंदी करुन अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:41 IST

परंतु एकटा रोखपाल एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार करु शकतो काय? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो़ अद्याप रोखपालाला अटक झाली नसून

ठळक मुद्देआरटीओ : आरोपी रोखपाल सापडेनाअटकेनंतर या प्रकरणाचे गूढ उकलणार

नांदेड : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील रोखपालाने ५६ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ आरोपी रोखपालाने तडजोड शुल्काच्या तीन वेगवेगळ्या पावत्यांवर वेगवेगळ्या नोंदी करुन हा अपहार केल्याचे पुढे आले आहे़ परंतु एकटा रोखपाल एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार करु शकतो काय? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो़ अद्याप रोखपालाला अटक झाली नसून त्याच्या अटकेनंतर या प्रकरणाचे गूढ उकलणार आहे़नवीन नांदेड भागातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील रोखपालाने पावतीपुस्तकात खोट्या नोंदी करुन ५६ लाख ९ हजार ५० रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ याप्रकरणी रोखपाल झेड़एम़शेख याच्या विरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ १६ आॅक्टोबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत कार्यालयीन वेळेत मागणी शुल्क आणि तडजोड शुल्क मानवीय पद्धतीने जारी करुन स्वीकारली़ रकमेचा भरणा करण्यासाठी असलेल्या पावती पुस्तकातील तीन पावत्यांच्या नोंदीमध्येच या घोटाळ्याचे मूळ आहे़ मागणी किंवा तडजोड शुल्क देणाऱ्याला आरोपी रोखपाल हा पूर्ण रकमेची पावती देत असे़ तर कार्यालयात जमा करण्यात येणाºया पावतीवर मात्र आपल्याला वाट्टेल ती रक्कम टाकून त्याचा भरणा करीत होता़अशाप्रकारे पाच हजारांची पावती कधी तर पन्नास, पाचशे रुपयांचीच झाली़ अशाप्रकारे केलेल्या घोटाळ्याबाबत कुणकुण लागताच शेखकडून खुलासा मागविण्यात आला होता़ शेख याने पावणेसात लाखांच्या रकमेचा भरणाही केला़ परंतु, त्यानंतरची रक्कम तो भरु शकला नाही़ त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेचे त्याने केले काय? या प्रकरणात तो एकटाच होता की अन्य कोणी साथीदार आहे? या बाबींचा उलगडा शेख याच्या अटकेनंतरच होणार आहे़ परंतु या प्रकारामुळे आरटीओतील अनागोंदी समोर आली आहे़

टॅग्स :NandedनांदेडRto officeआरटीओ ऑफीसfraudधोकेबाजी