शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनेवाडी गावांतील मतदानावरील बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:18 IST

विकास कामांची लेखी ग्वाही मिळाल्याने हिमायतनगर तालुक्यातील वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनेवाडी आदी गावातील मतदारांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला.

हिमायतनगर: विकास कामांची लेखी ग्वाही मिळाल्याने हिमायतनगर तालुक्यातील वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनेवाडी आदी गावातील मतदारांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला.हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या वाळकेवाडी-दूधड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनवेवाडी आदिवासी बहुलगाव आहे़ हे स्वातंत्र्य काळापासून रस्ता व इतर सुविधांचा अभाव आहे़ येथील नागरिकांनी रस्ता व इतर सुविधासाठी मिळण्यासाठी दीड महिन्याभरापूर्वी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. हदगावचे उपविभागीय अधिकारी वडदकर यांनी सदरील गावासियांना रस्त्यासह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे कागोदपत्री पाठपुरावा केल्याने त्या संदर्भाचे लेखीपत्र ४ रोजी तहसीलदार जाधव यांच्या हस्ते गावकऱ्यांना देण्यात आल्याने लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेण्यात आला. लेखी स्वरुपात आम्हाला पत्र देण्यात यावे तरच मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यात येईल, असा निर्धार गावक-यांनी घेतला होता. आचारसंहिता संपल्यानंतर रस्त्याचे काम १४ व्या वित्तआयोगातून मार्गी लागले जाईल आणि इतर मागण्यासंदर्भात शासन दरबारी कागोदपत्री पाठपुरावा करुन निराकरण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार जाधव यांंनी दिल्याने गावक-यांनी नियोजित बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसे लेखी पत्र गावक-यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

  • रस्त्याच्या मागणीसाठी गावकरी वारंवार पाठपुरावा करीत होते. मात्र प्रशासन काही दाद देत नसल्याने गावक-यांनी लोकसभा निवडणुकीवरील मतदानावर बहिष्कार घालू, असे लेखी निवेदन संबंधितांना दिले. निवेदनानंतर प्रशासन जागे झाले आणि त्यांनी गावक-यांनी मनधरणी सुरु केली. मात्र आम्हाला लेखी आश्वासन द्या, तरच बहिषकार मागे घेवू, अशी भूमिका गावक-यांनी घेतली. तहसीलदारांनी लेखी दिल्यानंतर गावकºयांनी आंदोलन मागे घेतले.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेड