शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाने निधी देऊनही प्राध्यापकांचे मानधन ५ महिन्यांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 11:09 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मूक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्रात आॅनलाईन पेपर मूल्यांकन केलेल्या संमत्रक आणि केंद्राना गत पाच महिन्यापासून  मानधन मिळाले नाही.

ठळक मुद्दे नाशिक विद्यापीठाने विभागीय केंद्राला १ कोटी ४० लाखाचा निधी देवूनही मानधन न मिळाल्याने एवढा निधी कुठे खर्च केला असा प्रश्न निर्माण झाला आहे़मूक्त विद्यापीठाचे  गत दोन वर्षापासून पेपर मूल्यांकनाचे काम आॅनलाईन पद्धतीने सुरू आहे़ नांदेड विभागात २९ तपासणी केंद्रात जवळपास १ हजार ५०० समंत्रक प्राध्यापकांनी मूल्यमापनाचे काम केले.

नांदेड:  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मूक्त विद्यापीठाच्यानांदेड विभागीय केंद्रात आॅनलाईन पेपर मूल्यांकन केलेल्या संमत्रक आणि केंद्राना गत पाच महिन्यापासून  मानधन मिळाले नाही़ नाशिक विद्यापीठाने विभागीय केंद्राला १ कोटी ४० लाखाचा निधी देवूनही मानधन न मिळाल्याने एवढा निधी कुठे खर्च केला असा प्रश्न निर्माण झाला आहे़ दरम्यान, ज्यांच्या काळात हा निधी मिळाला होता ते दोन्ही अधिकारी मात्र बदली करून गेल्याने या निधीची आता विद्यापीठ स्तरावर चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मूक्त विद्यापीठाचे  गत दोन वर्षापासून पेपर मूल्यांकनाचे काम आॅनलाईन पद्धतीने सुरू आहे़ नांदेड विभागातंर्गत हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील २९ तपासणी केंद्रात जवळपास १ हजार ५०० समंत्रक प्राध्यापकांनी मूल्यमापनाचे काम केले होते़ मात्र पेपर मूल्यांकन करून पाच महिन्याचा कालावधी लोटूनही मानधन मिळाले नाही़ विद्यापीठाने नांदेड विभागातील परिक्षेचे देयके व आॅनलाईन पेपर मूल्याकंनासाठी १ कोटी ४० लाखाचा निधीही दिला होता़ परंतु एवढा निधी तत्कालीन सहायक कुलसचिव यांनी कुठे व कोणत्या कामासाठी खर्च केला, हा प्रश्न उपस्थित झाला असून याच्या चौकशीसाठी समिती नेमल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नांदेड विभागातंर्गत हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील २९ तपासणी केंद्रात जवळपास १ हजार ५०० समंत्रक प्राध्यापकांनी मूल्यमापनाचे काम केले होते़ या सर्वांना मानधनाची प्रतीक्षा लागलेली असून विद्यापीठाने तातडीने मानधन अदा करावे, अशी मागणी होत आहे.

आठवडाभरात मानधन वितरित करुपेपर मूल्यांकन व केंद्राची देयके काही तांत्रिक कारणामुळे संबंधितांना मिळू शकले नाहीत़ यापूर्वीचे अधिकारी बदली होवून दुसºया विभागात गेले आहेत़ त्यामुळे मानधन देण्यास विलंब झाला आहे़ मात्र पुढील आठवड्यात मानधन देण्यात येईल़ असे  विभागीय कार्यालयातील रवींद्र रनाळकर यांनी सांगितले.

आठ ते दहा दिवसात मिळेल आॅनलाईन पेपर मूल्याकंनाचे मानधन अद्याप मिळू शकले नाही़, ही वस्तुस्थिती आहे. विद्यापीठाने विभागासाठी दिलेल्या निधीचा हिशोब सादर करणे अद्याप बाकी आहे़ हा हिशोब व अनामत रक्कम यांचा ताळमेळ झाल्यानंतर येत्या आठ, दहा दिवसात तातडीने मूल्याकंनाचे मानधन देण्यात येणार आहे.- अविनाश सरनाईक, विभागीय संचालक, मूक्त विद्यापीठ, नांदेड

टॅग्स :universityविद्यापीठNandedनांदेडProfessorप्राध्यापक