शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सचखंड गुरुद्वारात माथा टेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 18:32 IST

Amit Shah : सध्या धार्मिक स्थळे बंद असल्याने अमित शहा यांनी गुरुद्वाराच्या पायरीचे दर्शन घेतले.

नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांनी नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात ( Sachkhand Gurudwara Nanded) माथा टेकला. गृहमंत्री अमित शहा नांदेड दौऱ्यावर आहेत. आज दुपारी मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात त्यांनी सीआरपीएफच्या ( CRPF Camp ) वृक्षारोपण उपक्रमात १ कोटीव्या वृक्षाचे रोपण केले. 

आज सकाळी ११ वाजता नांदेड विमानतळावर गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन झाले. यानंतर हेलिकॉप्टरने ते मुदखेड येथिल केंद्रीय राखीव पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालयात पोहचले. येथे त्यांच्या हस्ते  १ कोटीव्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर तेलंगणातील एका कार्यक्रमासाठी रवाना झाले. तेलंगणातील कार्यक्रम आटोपून पुन्हा ते नांदेडला परतले. त्यानंतर त्यांनी नांदेड येथील सचखंड गुरुद्वारात माथा टेकला. सध्या धार्मिक स्थळे बंद असल्याने अमित शहा यांनी गुरुद्वाराच्या पायरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि भाजपच्या इतर नेत्यांची उपस्थिती होती. गृहमंत्र्यांनी गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने गृहमंत्री शहा यांचे प्रथेप्रमाणे स्वागत करण्यात आले.

हेही वाचा - ‘सीआरपीएफ’मुळेच देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत : अमित शहा

म्हणून नांदेडची निवड केली केंद्रीय सुरक्षा बलाने २ काेटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. दाेन वर्षांपासून हा कार्यक्रम राबवला जात आहे. यावर्षी ९९ लाख ९९ हजार ९९९ रोपांची लागवड करण्यात आली असून, १ काेटीव्या क्रमांकाचे रोप मी मुदखेड येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये लावताेय, ही माझ्या आनंदाची व गाैरवाची बाब आहे. १७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा वाढदिवस, निजामाच्या जुलमी शासनातून मराठवाडा व तेलंगणाची मुक्तता झाल्याचा सुवर्ण दिवस व गुरू गाेविंदसिघांची पावन भूमी. त्यामुळेच मी नांदेड जिल्ह्याची १ काेटीव्या वृक्ष लागवडीसाठी निवड केल्याचे शहा यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNandedनांदेडSachkhand Gurudwara Nandedसचखंड गुरुद्वारा नांदेड