शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये स्वच्छता कामगारांना मिळाले गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:36 IST

घाणीत उतरुन काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत आहे़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच महापालिका आणि संबधित कंपनीने त्याची दखल घेत सोमवारी स्वच्छता कामगारांना गणवेशासह हॅन्डग्लोज आणि मास्कचे वाटप केले़ स्वच्छतेचे काम करणाºया ८०० कामगारांना हे साहित्य मिळणार आहे़ त्यामध्ये महिला कामगारांचाही समावेश आहे़

ठळक मुद्देलोकमत इफेक्ट : महिला कामगारांना साड्या, हॅन्डग्लोज, मास्कचेही वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : घाणीत उतरुन काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत आहे़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच महापालिका आणि संबधित कंपनीने त्याची दखल घेत सोमवारी स्वच्छता कामगारांना गणवेशासह हॅन्डग्लोज आणि मास्कचे वाटप केले़ स्वच्छतेचे काम करणाºया ८०० कामगारांना हे साहित्य मिळणार आहे़ त्यामध्ये महिला कामगारांचाही समावेश आहे़शहरात स्वच्छतेची कामे करणारी महापालिकेची आणि आर अ‍ॅन्ड बी इन्फ्रा या कंपनीचे जवळपास ८०० कामगार आहेत़ या कामगारांवरच शहर स्वच्छतेची जबाबदारी आहे़ त्यासाठी सकाळी १० ते ५ या वेळेत घाणीत उतरुन हे कामगार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडत असतात़ परंतु त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीच खबरदारी प्रशासनाने घेतली नव्हती़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर सोमवारी दुपारी महापालिका प्रशासन आणि आर अ‍ॅन्ड बी इन्फ्रा या कंपनीने प्रातिनिधीक स्वरुपात काही कामगारांना गणवेश, हॅन्डग्लोज आणि मास्कचे वाटप केले़ प्रत्येक पुरुष कामगाराला दोन गणवेश देण्यात आले आहेत़ तर महिला कामगारांना सहा वारी आणि नऊ वारी साड्या दिल्या आहेत़ कंपनीने यापूर्वीच या कामगारांना जॅकेट दिले आहेत़ ८०० कामगारांसाठी १६०० गणवेश आले असून उर्वरित कामगारांना त्याचे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येणार आहे़त्यामुळे मंगळवारपासून स्वच्छता कामगार आता गणवेशात दिसणार आहेत़ यावेळी कार्यक्रमाला महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार, सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, गिता ठाकरे, मुख्य स्वच्छता निरिक्षक राजेंद्र गंदपवार, आर अ‍ॅन्ड बी इन्फ्राचे प्रमुख अशोकसिंह पाल, व्यवस्थापक अनिल इटकापल्ले यांची उपस्थिती होती़---तीन दिवस गणवेश घालणे बंधनकारकस्वच्छता कामगारांनी आठवड्यातील सहा दिवस गणवेश घालणे अपेक्षित आहे़ परंतु किमान तीन दिवस गणवेश न घातल्यास त्यांचा अर्धा दिवसाचा पगार कापण्यात येणार आहे़ अशा सुचनाही यावेळी दिल्या़

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाEmployeeकर्मचारी