शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 01:00 IST

ज्या ठिकाणी कृषीपंपांचा लोड जास्त आहे, अशा ठिकाणच्या फीडरच्या सेपरेशनची कामे पूर्ण करावीत.

ठळक मुद्देमहावितरणची आढावा बैठक संचालक साबू यांचा इशारा

नांदेड : ज्या ठिकाणी कृषीपंपांचा लोड जास्त आहे, अशा ठिकाणच्या फीडरच्या सेपरेशनची कामे पूर्ण करावीत. लोड प्लानिंग करण्यासाठी ऐएमआर रिडींग महत्त्वाचे असल्याने सर्व वीजवाहिन्यांचे (फीडर) ऐएमआर रिडींग झालेच पाहिजे. याबाबतीत हलगर्जीपणा करणा-या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, सेवापुस्तिकेमध्ये त्याची नोंद घेतली जाईल, असा सज्जड इशारा महावितरणचे संचालक दिनेशचंद्र साबू यांनी दिला.नांदेड परिमंडळाच्या सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सुरु असलेल्या विविध योजनांच्या कामांचा साबू यांनी आढावा घेतला. या बैठकीस नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता डी.व्ही.पडळकर, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता काकाजी रामटेके, नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे, परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे, हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.भविष्यातील वाढती वीजग्राहक संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधा भक्कम करण्याकरिता एकात्मिक ऊर्जाविकास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या उपकेंद्रांची व इतर महत्त्वाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता यांनी काम करणा-या एजन्सीसोबत समन्वय ठेवत मार्चपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यरत रहावे, असे निर्देश संचालक साबू यांनी दिले. त्याचबरोबर आपल्या कार्यक्षेत्रातील अपघात स्थळांचे सर्वेक्षण करुन आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण कराव्यात.आपण विकलेल्या विजेचा महसूल वेळेवर प्राप्त होणे महत्त्वाचे असल्याने प्रत्येक अधिकारी- कर्मचारी यांनी जबाबदारीने काम करणे महत्त्वाचे आहे. वीजबिल दरमहा भरण्याची सवय ग्राहकाला लागावी यासाठी प्रामाणिकपणे काम करा तसेच वीजग्राहकांशी सौजन्य ठेवत अखंडित वीजसेवा द्यावी, असे आवाहनही साबू यांनी केले.

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीज