शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

"अफगाणिस्तानमधील बौद्ध स्थळांची सुरक्षा संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता सैनिकांनी व युनिसेफने करावी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:24 IST

चौथ्या ते पाचव्या शतकामधील बामियान या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दोन बौद्ध विशाल मूर्ती २००१ मध्ये तालिबानचे नेते मोहम्मद उमर ...

चौथ्या ते पाचव्या शतकामधील बामियान या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दोन बौद्ध विशाल मूर्ती २००१ मध्ये तालिबानचे नेते मोहम्मद उमर यांच्या सूचनेवरून मिर्झा हुसेन यांच्या सहकार्याने पंचवीस दिवस डायनामाईट लावून नष्ट करण्यात आल्या होत्या. इसवी सनाच्या ५०७ मध्ये उभारण्यात आलेली ३५ मीटर उंचीची व इसवी सन ५५४ मध्ये उभारण्यात आलेली ५३ मीटर उंचीची या दोन विशाल बुद्धमूर्ती तालिबान्यांनी डायनामाइट लावून नष्ट केल्या. मार्च २०२१ मध्ये त्या ठिकाणी लेझरच्या माध्यमातून या मूर्ती पर्यटकांना पुन्हा एकदा दाखवण्यासाठी प्रयत्न प्रारंभ करण्यात आले होते. गांधार शैलीतील या मूर्ती व अजिंठा येथील नवव्या आणि दहाव्या गुंफेतील चित्र (मीरम शैली) मध्ये बरेच साम्य आढळते.

२०१५ मध्ये बामियान या शहराची निवड दक्षिण आशिया सांस्कृतिक राजधानी म्हणून करण्यात आली होती.

बामियान व अफगाणिस्तानमधील इतर आत्यंतिक महत्त्वाच्या बौद्ध स्थळांची सुरक्षितता करणे आवश्यक आहे. ही स्थळे केवळ बौद्ध धर्मीयांच्या साठी महत्त्वाची नसून संपूर्ण मानवी इतिहासासाठी व प्राचीनतम रेशीम मार्गावरील हीच महत्त्वाची बौद्ध स्थळे जपणूक होणे आवश्यक आहे. तालिबान्यांचा मागील कार्यकाल पाहता उरलीसुरली बौद्ध ऐतिहासिक स्थळे नष्ट होण्याची भीती असल्यामुळे वेळीच संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या युनिसेफ या संघटनेच्या माध्यमातून आणि संयुक्त राष्ट्राच्या शांतता सैनिकाच्या सहकार्याने बौद्ध परिसराची सुरक्षा करावी, अशी मागणी दीपक कदम यांनी युनिसेफच्या प्रमुखाकडे केली आहे. भारत सरकारनेसुद्धा या बाबीकडे विशेष लक्ष देऊन बौद्धांच्या या ऐतिहासिक स्थळांची सुरक्षितता कशा प्रकारे केली जाईल यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडे अशा प्रकारची मागणी तात्काळ करावी अशी विनंती दीपक कदम, प्रमुख आंबेडकरवादी मिशन युनिवर्सल बुद्धिस्ट संघ यांनी केली आहे.