शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उमरीचे कृषी अधिकारीपद दोन वर्षांपासून रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:05 IST

उमरी : येथील तालुका कृषी कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त असल्याने विविध कामांसाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देबिलोलीला सहा वर्षांनंतर मिळाले कृषी अधिकारी, कार्यालयातील १२ पदे अद्यापही रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : येथील तालुका कृषी कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त असल्याने विविध कामांसाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.शेती संपन्न असलेल्या उमरी येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिका-याचे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. तालुक्यात अनेक शेतकरी नवनवीन शेती विषयक उपक्रम राबवून पुढे येत आहेत़ मात्र उमरी येथे कृषी अधिकारी नसल्याने त्यांना शासनाच्या नवीन उपक्रमांची व योजनांची पुरेशी माहिती मिळत नाही. आतापर्यंत बाहेरील तालुक्याच्या कृषी अधिका-यांना येथील तात्पुरता पदभार सोपविण्यात आला होता. आजवर त्यांच्याकडूनच उमरी तालुक्याचे काम करवून घेतल्या गेले. महिन्यातून एक-दोन वेळा उमरीला येऊन हे अधिकारी थातूरमातूर काम पाहत असत. उमरी तालुक्यातील शेतक-यांसाठी येणा-या विविध योजना तसेच कृषी कार्यालयाशी संबंधित कामेही वेळेवर होत नसत़ त्यामुळे शेतक-यांना सतत अडीच वर्षांपासून या गैरसोयींचा सामना करावा लागला. गेल्या अडीच महिन्यांपूर्वी हिंगोली येथून गरजे यांची उमरीला बदली झाल्याचे आदेश काढण्यात आले. तेव्हापासून गरजे हे अद्यापपावेतो उमरीला रुजू झाले नाहीत. उमरी तालुक्यात पीक विम्यासंदर्भात शेतक-यांच्या असंख्य तक्रारी आहेत. पीकविम्याच्या हप्त्यापोटी मोठ्या प्रमाणात रकमा भरूनही शेतक-यांना मात्र दोनशे ते अडीचशे रुपये असा अत्यंत तोकड्या स्वरूपात पीकविमा मिळाला़याबाबत शेतक-यांनी उमरी कृषी कार्यालयात चौकशी केली़ मात्र येथे तालुक्याचा मुख्य अधिकारीच नसल्याने त्यांचा नाईलाज झाला. अशा विविध प्रकारच्या शेतक-यांच्या समस्या असून येथे पूर्णवेळ स्वतंत्र पदभार असलेला तालुका कृषी अधिकारी नियुक्त करणे अत्यंत गरजेचे आहे.तालुक्यात १२ सज्जे असून दोन कृषी पर्यवेक्षक व एक मंडळ कृषी अधिकारी अशी पदे आहेत. तालुक्यात ६२ गावांतून येणारे शेतकरी आपल्या शेतीविषयक अनेक समस्या घेऊन येताना दिसतात. मात्र येथे तालुका कृषी अधिकारी नसल्याने आपले गा-हाणे सांगावे तरी कुणाला? अशी स्थिती झाली आहे.---बिलोलीतील पदे भरा, अन्यथा आंदोलनबिलोली : येथील तालुका कृषी अधिकारी पद तब्बल सहा वर्षानंतर भरण्यात आले आहे. मात्र अद्यापही येथे बारा पदे रिक्त असून शेतक-यांना नेहमीच गैरसोयीचा सामना करावा लागतो.तालुका कृषी अधिकारी पदी मुदखेड येथून विजय घुगे यांनी पदभार स्वीकारला. तालुका कृषी अधिकारी पदाचा कार्यभार मागील सहा वर्षांपासून प्रभारी तर कधी अतिरिक्त राहत आलेला आहे़ पर्यवेक्षकासह येथे १२ पदे रिक्त आहेत. पावसाळापूर्व पालिका विरोधी पक्षनेता अनुप अंकुशकर यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. सन २०१२ मध्ये कृषी अधिकारी जहूर खान यांची बदली झाल्यानंतर वर्ग २ चे पद सतत रिकामेच होते. प्रभारी पदामुळे सातत्याने कामे खोळंबत असत. तालुक्यातील २ पालिका व ७३ ग्रामपंचायतअंतर्गत ५० हजारांपेक्षा जास्त शेतकरी आहेत. सातत्याने पदे रिक्त असल्याने शेतक-यांच्या अडचणी येत आहेत. उर्वरीत रिक्त पदे भरावीत अन्यथा येत्या स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्यात येईल, असा इशारा अंकुशकर यांनी दिला. सध्या शेती हंगाम असून कृषी पदांची आवश्यकता आहे. प्रशासनाने रिक्त पदे भरुन शेतीची व शेतक-यांच्या अडचणी सोडवाव्यात. प्रमुख पदे नेहमीच रिक्त राहण्याचा सपाटा सुरु आहे.

टॅग्स :Nandedनांदेडagricultureशेती