शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड परिमंडळात कृषीपंप ग्राहकांकडे दोन हजार कोटी थकले, चालू देयक न भरल्यास कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 13:43 IST

महावितरणच्या नांदेड परिमंडळातील कृषीपंप ग्राहकांकडील वाढती थकबाकी लक्षात घेता थकबाकीस आळा घालण्याकरिता जे कृषीपंपधारक चालू देयक भरणार नाहीत, अशा कृषीपंप वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई आजपासून हाती घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे चालू देयक अर्थात दोन त्रैमासिक देयकं कृषीपंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीनही जिल्ह्यांमध्ये कृषीपंप धारकांची वीजदेयक वसुली मोहीम कठोरपणे राबवली जाणार आहे.

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडळातील कृषीपंप ग्राहकांकडील वाढती थकबाकी लक्षात घेता थकबाकीस आळा घालण्याकरिता जे कृषीपंपधारक चालू देयक भरणार नाहीत, अशा कृषीपंप वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई आजपासून हाती घेण्यात आली आहे. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ अखेर आकारण्यात आलेले चालू देयक अर्थात दोन त्रैमासिक देयकं कृषीपंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.

नांदेड परिमंडळांतर्गत असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वीज क्षेत्रामध्ये उधारीचे दिवस संपुष्टात आले असल्याने वीज देयकांची वसुली होणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीनेच आता कृषीपंप ग्राहकांच्या वीजबिल थकबाकी वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष दिले आहे़. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ अखेर आकारण्यात आलेले चालू देयक अर्थात दोन त्रैमासिक देयकं कृषीपंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.

नांदेड परिमंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीनही जिल्ह्यांमध्ये कृषीपंप धारकांची वीजदेयक वसुली मोहीम कठोरपणे राबवली जाणार आहे. परिमंडळामध्ये एकूण २ लाख ८६ हजार ८०१ कृषीपंप वीज ग्राहकांकडे जून २०१७ अखेर २ हजार १६२ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १ लाख २३ हजार २२० ग्राहकांकडे ८९८ कोटी ५८ लाख रुपयांची तर परभणी जिल्ह्यातील ९२ हजार ८८० ग्राहकांकडे ७५० कोटी ३३ लाखांची आणि हिंगोली जिल्ह्यातील ७० हजार ७०१ ग्राहकांकडे ५१४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदार कृषीपंप वीजग्राहकांनी वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी दोन त्रैमासिक वीजबिलाची रक्कम त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 

कपॅसीटर बसवले तरच रोहित्र बदलून मिळेल

४नांदेड परिमंडळाची थकबाकी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करुन त्वरित वीजबिल भरावे. कृषीपंप धारक वीज ग्राहकांचे रोहित्र जळाल्यास अथवा बंद पडल्यास ते दुरुस्त करण्यापूर्वी संबंधित कृषीपंप वीज ग्राहकांनी कृषीपंपावर योग्य क्षमतेचा कपॅसीटर बसवला आहे किंवा नाही याची खातरजमा केल्यानंतरच नवीन रोहित्र देण्यात येईल- अविनाश पोटोळे, मुख्य अभियंता, नांदेड़